पुणे (निवडणूक विशेष)  राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसोबत सामंजस्याने राहून राज्याचा कारभार चालवत आहेत अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मात्र स्थानिक नेत्यांना पक्षश्रेष्ठी एकमेकांमध्ये लढण्यास भाग पाडत आहेत असे चित्र सध्यातरी राज्यात दिसून येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुती व महाविकास आघाडी हे परस्परांसमोर उभे राहतील असे चित्र प्रथमदर्शनी दिसून येत होते परंतु विरोधी पक्षांमध्ये एकमेकांच्या पुण्याहून यावरून आणि काही पक्षांना समावेश करण्याच्या प्रयत्नातून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचे दिसून येत आहे काही ठिकाणी तर महाविकास आघाडी मधील घटक पक्ष व महायुतीतील घटक पक्ष यांच्यात सरळ सरळ युती होऊन आपल्यात सहकाऱ्यांविरुद्ध आवाहन उभा करण्याचे प्रयत्न होत आहेत.

राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा देऊन आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जे राज्यामध्ये नेतृत्व करतात असे आमदार व त्यांच्या संबंधित नातेवाईकांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मलीद्याची पदे देऊन निवडणूक रिंगणामध्ये उभे केल्याचे दिसून येते आहे अनेक मंत्री आमदार यांनी आपले बंधू पत्नी काही ठिकाणी आई यांना उमेदवारी देऊन नगराध्यक्ष पद आपल्या पदरी ओढून घेतल्याचे दिसून येत आहे यामुळे वर्षानुवर्ष पक्षाशी प्रामाणिकपणे काम करून पक्षाला एवढ्या मोठ्या मताधिक्याने राज्यात क्रमांक एक वर पक्षाची प्रतिमा उंचावली आशा कार्यकर्त्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था हा एक संधीचा भाग असतो. राज्यात भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट हे सत्तेत असून निवडणुकीच्या रणधुमाळीत स्थानिक पातळीवर आघाड्या करून तसेच मैत्रीपूर्ण लढत करण्याचे सुरुवातीला एकमेका ठरले परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष एकमेकांना प्रति आव्हान देताना दिसून येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महायुती धुसफूस पाहायला दिसून येत असून भाजप व शिंदे यांची शिवसेना हे एकमेकांच्या पुढे आव्हान उभे करण्याचे प्रयत्न होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *