पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे पोलिसांना वारंवार स्थानिक गुन्हेगारांकडून गावठी कट्टे मिळत होते अशाच प्रकारच्या काळेपडळ पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हेगारांकडून चार गावठी कट्टे आणि पाच जिवंत काढत असे हस्तगत केल्यानंतर पुणे पोलिसांनी याच्या मुळाशी जाण्याचे ठरवले.बेकायदेशीर शस्त्रास्त्र पुरवठा करणा-या रॅकेटवर उमरटी, मध्यप्रदेश येथे पुणे शहर पोलीसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय ३६ संशयित ताब्यात घेतले.संघटित गुन्हेगारी विरुद्धच्या महत्त्वपुर्ण तपासात पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने एक मोठे आंतरराज्यीय अवैध शस्त्रास्त्र पुरवठा व तस्करी करणारे रॅकेट उद्धवस्त केले आहे.

विमानतळ पोलीस स्टेशन अंतर्गत कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ११ गावठी कट्टे तसेच काळेपडळ पो. स्टे. येथील ४ गावठी कट्टे, खंडणी विरोधी पथक -१ येथील २ कट्टे , खंडणी विरोधी पथक -२ येथील ३कट्टे, युनिट ३ येथील १कट्टा असे एकुण २१ कट्टे जप्त केल्यानंतर या अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील तपासाच्या आधारे उमरटी, ता. लेघवा जि. बडवाणी, राज्य मध्यप्रदेश येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गावठी कट्टे तयार करुन पुरवठा करुन आंतरराज्य तस्करी केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, सोमय मुंडे यांचे नेतृत्वाखाली परिमंडळ-४ व गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश पोलीसांच्या सहकार्याने दि.२२/११/२०२५ रोजी पहाटे सदर ठिकाणी छापा टाकुन कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान तेथे बेकायदेशीर शस्त्रांच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या ३६ संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.मोठ्या संख्येने शस्त्रे आणि शस्त्र बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
बेकायदेशीर शस्त्रांच्या मोल्डिंग आणि निर्मितीसाठी वापरल्या जाणा-या ५० भझ्या घटनास्थळीच नष्ट करण्यात आल्या.अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रास्त्रे भरण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. चौकशीतुन आणि तांत्रिक पुराव्यांवरुन असे दिसुन आले की, याठिकाणी उमरटी शिकलगार आर्म्स (युएसए) या ब्रँड नावाखाली मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र निर्मिती करुन त्याची तस्करी करण्याचे रॅकेट उमरटी या गावातुनच कार्यरत असुन सदर ठिकाणावरुन बेकायदेशीररित्या गावठी कट्टे तयार करुन, पुरवठा करुन आंतरराज्य तस्करी केली जाते. बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करण्याच्या साखळीचा शोध घेऊन अंतिम बेकायदेशीर शस्त्र प्राप्तधारकाची माहिती निष्पन्न करण्यासाठी तपास चालु आहे.

विशेष मोहिम दरम्यान पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे सुरक्षिततेकरीता क्विक रिस्पॉन्स टीम (क्युआरटी), आर्म व अॅम्युनिशनसह सोबत ठेवलेली होती. या कारवाई दरम्यान मोबाईल सर्व्हेलन्स व्हेईकल्स, तात्पुरते वायरलेस नेटवर्क, बुलेट प्रुफ (बीपी) जॅकेट आणि बॉडी वॉर्न कॅमेरे यासारख्या महत्त्वपुर्ण तांत्रिक सहाय्याचा देखील वापर करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर पंकज देशमुख,. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर सोमय मुंडे यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक नितीन नाईक, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, सहा. पोलीस निरीक्षक कल्याणी कासोदे, पोलीस अंमलदार पठाण, देशमुख, कारखेले, मुंढे, पवार, तांबेकर, रोकडे, रणपिसे, माने, खरात, पानसरे यांनी पुण्यापासुन ५०० किलोमीटर लांब जाऊन यशस्वीरित्या पार पाडली आहे.
