थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) नायगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विजय विठ्ठल चौधरी व उपाध्यक्ष पदी दत्तात्रय रामचंद्र गुळुंजकर यांची निवड करण्यात आली.नायगाव ग्रामसभेमध्ये ही निवड करण्यात आली .यावेळी सभेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठीत करणे या विषयास अनुसरून वरील निवड करण्यात आली.
तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी विजय विठ्ठल चौधरी व उपाध्यक्ष पदासाठी दत्तात्रय रामचंद्र गुळुंजकर यांनी इच्छुक नावे सुचविली. अध्यक्ष सरपंच सौ कल्याणी संदीप हगवणे व ग्रामसेविका विजया भगत यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड घोषित केली.
यावेळी उपसरपंच दत्तात्रय बारवकर, गणेश गुलाब चौधरी, जितेंद्र पांडुरंग चौधरी, संगीता शेलार,कल्याणी हगवणे, पल्लवी गायकवाड, उतम शेलार, बाळासाहेब गायकवाड , प्रियंका गायकवाड , कृष्णा चौधरी, विकास चौधरी, विठ्ठल चौधरी, शिवाजी चौधरी, माया चौधरी, कल्पना पवार,पोलीस पाटील अर्जुन पवार , रामचंद्र पवार ,संतोष हगवणे , पोपट चौधरी, उत्तम घुले, ज्ञानोबा शेलार, योगेश चौधरी ,नितीन हगवणे ,रामचंद्र माने , बापू चौधरी, विजय चौधरी , गणेश चौधरी, अर्जुन चौधरी , विठ्ठल हगवणे, किरण गुळुंजकर, संजय खेडेकर, कैलास चौधरी,भाऊसाहेब चौधरी, नवनाथ गायकवाड, अमोल खेडेकर, किरण चौधरी, अविनाश चौधरी,युसुफ शेख , शांताराम उरसळ , गोरख चौधरी, नंदू चौधरी, संजय चौधरी, सुनील हगवणे आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सांगितले की गावातील तंटे गावातच सर्वांना बरोबर घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
