लोणी काळभोर (हवेलीनामा वृतसमूह) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ (३) अंतर्गत घरमालक यांनी भाडेकरु ठेवताना तसेच खाजगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षीतते बाबत दक्षता घेण्यासाठी याची माहिती पोलीसांना देणे बंधनकारक आहे याविषयीचे आदेश पुणे शहर आयुक्तालयाने काढलेले असुन त्याबाबत पोलीस विभागातर्फे वेळोवेळी प्रसार माध्यमाव्दारे त्याची प्रसिध्दी करण्यात आली आहे. परंतु अनेक जागा मालकांनी अथवा खाजगी मालकांनी भाडेकरू अथवा नोकऱ्यांची माहिती पोलिसांना दिली नाही अशाच एका लोणी काळभोर येथील जागामालकावर सतरा भाडेकरू ठेवून याची माहिती पोलिसांना दिली नाही याबाबत लोणी काळभोर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

दिल्लीत झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात भाडेकरूंची माहिती तसेच हद्दीमधील हॉटेल, लॉजेस मर्मस्थळे व गर्दीचे ठिकाणी भेटी देण्यासाठी वरिष्ठांचे आदेशाने पोलीस स्टेशन स्तरावर पथक निर्माण करण्यात आलेले आहे. दिनांक १९/११/२०२५ रोजी अफसर अहेसान अन्सारी याच्याकडे ब्राउन रंगाची मॅफेड्रॉन (एम.डी.) मिळुन आल्यानंतर त्यांचे काळभोर हाईट्स, पाषाणकर बाग, लोणी काळभोर, हवेली, पुणे येथील राहत्या घरी अधिक चौकशी केली असता तों भाडेतत्त्वावर राहण्यास असुन घरमालक यांनी त्यांच्या इमारतीमध्ये एकुण १७ भाडेकरू ठेवलेले होते. ठेवण्यात आलेल्या भाडेकरूंची माहिती पोलीसांना कळविणे बंधनकारक असताना ती कळविली नसल्याने त्यांचे विरुध्द लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास सुरु आहे.

ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस ठाणे पुणे शहर, पोलीस हवा. रवि आहेर, संदीप जोगदंड, बापु वाघमोडे यांचे पथकाने केली असुन त्यामध्ये अधिक तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडुन करण्यात येत आहे.

 

आवाहन : – 

लोणीकाळभोर पोलीस ठाणेचे वतीने आवाहन करण्यात येते की, ज्या घरमालकानी भाडेकरु ठेवलेले आहेत. त्यांनी भाडेकरूंची माहिती तसेच खाजगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षीतते बाबत दक्षता घेणे करीता सदरची माहिती भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३(३) प्रमाणे पोलीसांना देणे बंधनकारक असल्याने माहिती सादर करावी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *