पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५, पुणे शहर यांच्या अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशन मधील हरविलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यासाठी नेताजी मंगल कार्यालय हडपसर पुणे या ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम नागरिक आणि पोलीस दल यांच्यातील विश्वासाची कडी निर्माण करणारा ठरला.
हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ राजकुमार शिंदे यांनी सी.ई.आय. आर प्रणाली कशी कार्य करते, हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलीसांकडून वापर केल्या जाणाऱ्या तांत्रिक पध्दतींचा वापर याबाबत सर्वसमावेशक माहिती दिली तसेच यांच्या हस्ते १७१ मोबाईल परत करण्यात आले. त्यामध्ये हडपसर पोलीस स्टेशन कडील ११९ मोबाईल यांचा समावेश होता.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, श्रीमती अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, श्रीमती नम्रता देसाई यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर संजय मोगले, पोनि (गुन्हे) निलेश जगदाळे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, सायबर विभागाचे पोलीस उप-निरीक्षक अल्ताफ शेख, पोलीस अंमलदार संदीप राठोड, बापु लोणकर, माधुरी डोके, सोनाली कुंभार, विक्रम भोर, समीर पांडुळे, प्रकाश सावंत, सुनिल आव्हाड, स्वप्नील भुजबळ, तुकाराम झुंजार, अमोल दणके व महाविर लोंढे यांनी केली.
