जालना (हवेलीनामा वृत्तसमूह) जालन्यात एका शाळकरी विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आत्महत्येचं कारण जरी स्पष्ट झाले नसले तरीही शिक्षकाच्या चाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप पालक करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सकाळी साडे सातच्या दरम्यान शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन या आठवी इयत्ता शिकनाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली याची सखोल माहिती पोलीस घेत आहेत तपास चालू असून आत्महत्येचे कारण काय आहे याची माहिती समोर आलेली नाही.
