नवी दिल्ली (हवेलीनामा वृतसमूह) दुबईमध्ये एअर शो दरम्यान भारतीय बनावटीचे तेजस हे विमान कोसळले यात वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हे विमान दुबई येथे एअर शो मध्ये सामील झाले होते.

मेक इन इंडिया अंतर्गत संपूर्ण भारतीय बनावटीचे तेजस हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले विमान आज दुबई येथे आंतरराष्ट्रीय शोमध्ये सामील झाले होते यादरम्यान उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान कोसळले व मोठा स्पोर्ट झाला यामध्ये वैमानिक ठार झाला दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

4.5 जनरेशन ही विमान असून याबद्दलची आणखी अपडेट एअर फोर्स कडून देण्यात आलेली नाही हवेत झपावल्यानंतर तेजस विमानाला मोठा अपघात घडल्याचे माहिती आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *