थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर गावातील महावितरण कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालू असून याकडे कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याचे चित्र अनुभवास येत आहे गेली अनेक दिवसांपासून महावितरणच्या ग्राहकांच्या अनेक अडचणी गाव पातळीवरील एका ग्रुपच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष संपर्क साधण्याच्या माध्यमातून उघड होताना दिसत आहेत विशेष म्हणजे थेऊर कार्यालयाचे अभियंता गेल्या सहा महिन्यात पूर्वी पदोन्नती होऊन बदली झाल्यानंतर आज तगायत महावितरण कडून दुसऱ्या अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली नाही परिणामी येथील कर्मचारी काय काम करतात कोणत्या प्रकारची देखभाल दुरुस्ती झाली याची सुद्धा माहिती उपलब्ध होऊ शकत नाही.

येथील तारमाळा विभागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या वेज समस्या निर्माण होत आहेत अनेक वेळेला वीज पुरवठा खंडित होतो तर काही वेळेला तो अपुरा पुरवठा करण्यात येत आहे काल पासून या परिसरामध्ये अपुरा पुरवठा होत असल्याची तक्रार अनेक ग्राहक करत आहेत तो पुरवठा आतापर्यंत सुरळीत झालेला नाही त्यामुळे अनेकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

प्रसिद्ध व्यावसायिक विजय कुंजीर यांनी सांगितले की तारमाळा परिसरासाठी कोणता कायमस्वरूपी कर्मचारी काम करतो याची कल्पना नाही बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांचे फोन लागत नाहीत त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यात अडचणी येत आहेत.

उद्योजक अण्णा बोडके यांनी सांगितले की गेले अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये विजयच्या समस्या निर्माण होत आहेत याचे कारण काय आहे याची या परिसरातील नागरिकांना कुछ होता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर ही अडचण दूर करावी.

यावर मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता याविषयी आपण माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसेच कायमस्वरूपी अभियंता नियुक्ती संदर्भात मात्र त्यांच्याकडून काही माहिती कळू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *