किरण खुडे
राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) राजगुरुनगर नगरपरिषदेच्या सन २०२५ ते २०३० च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारांनी अकरा तर २१ नगरसेवक पदासाठी १६५ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. वैशाली पाटील यांनी दिली.
नगरपरिषद निवडणुकांची धामधूम आता अंतिम टप्यात पोहोचली असून, उमेदवारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला.अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने विविध पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांनी शहरात मिरवणूका काढून उमेदवारी अर्ज दाखल केले.
दरम्यान नगरपरिषद कार्यालयामध्ये मोठी गर्दी झाली होती. नगराध्यक्षपदासाठी पदासाठी बापूसाहेब किसन थिगळे (शिवसेना उद्धव ठाकरे गट ), किरण चंद्रकांत आहेर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ), मंगेश वंसतराव गुंडाळ ( शिवसेना शिंदे गट), शिवाजी नंदकुमार मांदळे ( भाजपा ), दिपक रामदास थिगळे ( अपक्ष ),गणेश कुमार इंगवले ( अपक्ष ) यांनी अर्ज दाखल केले आहेत.
महायुतीतील तीनही पक्ष एकमेकांसमोर उभे असल्यामुळे या निवडणुकीत रंगातदार लढाई अनुभवास येईल असे चित्र आहे.
