थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) गेल्या काही दिवसापासून थेऊरमध्ये बुलेट्स मधून फटाका आवाज काढण्याची जणू स्पर्धाच लागलेली असल्याचे दिसून येत आहे. जोरजोरात आवाज काढत रस्यावरून गाडी चालवणे ही जणू नित्याचीच बाब आहे.

येथील नायगाव रस्त्यावर दररोज हा खेळ चालतोय यावर कोणाचेच बंधन नाही. सायलेंसर मध्ये बदल करून मोठमोठ्याने आवाज करत बुलेट चालवून वातावरण दूषित करण्याचे काम चालू आहे.

काही दिवसांपूर्वी लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी विशेष मोहीम राबवून लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावांमध्ये अशा बुलेट्स वर कार्यवाही केली होती तरीही यात कमी आलेली नाही या बुलेटमध्ये करण्यात येणाऱ्या बदलास कोण कारणीभूत आहे याच्या तळाशी जाऊन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *