पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) स्थानिक गुन्हे शाखा व नारायण गाव पोलिसांनी दिवाळीच्या दिवसात
घरफोडी करणारा रेकॉर्डवरील सराईत चोरट्यास जेरबंद करुन ०३ गुन्हे उघडकीस आणून १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ८४१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार सायकल, असा एकूण सुमारे १४ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णू भागूजी सांगडे (वय ६२ वर्षे रा. वैभवलक्ष्मी सोसा ए.विंग तिसरा मजला फलॅट नं. २१, विटेमळा नारायणगाव ता. जुन्नर ) हे त्यांचे राहते घराला कुलुप लावून काकडा आरती करीता नारायणगाव येथील मंदीरात गेले असताना पहाटे चार ते पाचच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरुम मधील लाकडी कपाटातून सोने-चांदीचे दागिने एकूण ११,२०,०००/- किंमतीचा दागिने चोरी करून नेले होते
दिवाळी सणाच्या सुरूवातीस जुन्नर उपविभागात घरफोडी चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. सदर गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करण्यात आला. घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका काळे रंगाचे मोटार सायकलवरील एक संशयितांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तसेच घटनास्थळावरून संशयित मोटार सायकल ही चाकण बाजूकडे गेली होती.
संशयित मोटार सायकलचा व आरोपींचा शोध घेत असताना पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गुन्हयातील संशयित मोटार सायकल ही सीबीझेड मोटार सायकल असून विशाल दत्तात्रय तांदळे सध्या रा. मंचर ता. आंबेगाव हा वापरत आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपीवर यापुर्वी मालमत्ता चोरीचे एकुण २८ गुन्हे दाखल असुन सदरचा गुन्हा त्याने केला असल्याचे सांगितले.
तपास पथक हे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी नारायणगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने, नारायणगाव परिसरात पथकाने सापळा रचून आरोपी विशाल दत्तात्रय तांदळे (वय २८ वर्षे सध्या रा. मंचर ता. आंबेगाव जि.पुणे मुळ रा. पाटेगाव ता. कर्जत) यास सीबीझेड मोटार सायकलसह ताब्यात घेतले त्याच्या कडे चौकशी केली असता घरफोडीची कबूली दिली यात
नारायणगाव पोलिस स्टेशनचा एक व जुन्नर दोन अशा तीन गुन्ह्याची कबुली दिली आरोपीकडून गुन्हयात चोरीस गेलेले १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ८४१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार सयाकल असा एकूण सुमारे १४,३७,९५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल , अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सपांगे, महोदव शेलार, पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजु मोमीन, संदिप वारे, अक्षय नवले, नारायणगाव पो स्टे चे पोसई सोमश्वर शेटे, पोलीस अंमलदार मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, निलेश जाधव यांनी केली आहे.
