थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) श्रीक्षेत्र थेऊर गावातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गवरील अवजड वाहनांचा कर्णकर्कश्य हॉर्नचा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे , या परिसरात रस्त्यावर प्रतिबंधात्मक सूचना फलक देखील लावलेले नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कधी लक्ष देणार असा नागरिकांनी प्रश्न उपस्थिती केला आहे.

अष्टविनायक सुविधा प्रकल्प अंतर्गत थेऊर फाटा पासून लोणीकंद पर्यंत रस्त्याचे काम खाजगी कंत्राटदाराकडून पूर्ण करण्यात आले यासाठी शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च झाला आहे परंतु या मार्गावरील अनेक त्रुटी तशाच असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग का दुर्लक्ष करत आहे हा अनुत्तरीत प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर फलक सुद्धा नाहीत त्यामुळे अपघात प्रमाण वाढले आहे अनेकांनी आपले जीव या रस्त्यावर गमावले आहेत हा मार्ग थेऊर, कोलवडी, केसनंद या गावातून जातो आहे थेऊर मधील प्राथमिक शाळा व चिंतामणी विद्या मंदिर या परिसरातून हा मार्ग जात असल्याने या मार्गावर असलेली प्रचंड अवजड वाहतूक आणि हे वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश्य प्रेशर हॉर्न वाजवून शालेय विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते तसेचहे त्यांच्या शैक्षणिक जीवनासाठी त्रासदायक ठरत आहेत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग व तसेच वाहतूक नियंत्रक पोलीस यंत्रणा यांनी तत्परतेने या मार्गावर फलक लावून कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी.

केंद्रीय अवजड व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रेशर हॉर्न वर कारवाई करण्यासंदर्भात एका कार्यक्रमात जाहीर केले होते परंतु याची अंमलबजावणी आजपर्यंत झालीच नाही. या भयंकर हॉर्नमुळे वयोवृद्ध, आजारी रुग्ण तसेच गरोदर माता लहान मुले यांना प्रचंड त्रास होतो. यासाठी यावर योग्य उपाययोजना करावी अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *