पुणे [CRIME]-(हवेलीनामा वृत्तसेवा) चतु:र्श्रुंगी पोलिसांची अवैध हुक्का पार्लरवर कारवाई बिनदिक्कत अनाधिकृतपणे शेतात चालु असलेल्या हुक्का बारवर कारवाई करुन ४८६५०/ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
             चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक ०८/११/२०२५ ला कॉम्बींग ऑपरेशन मोहिमेदरम्यान तपास पथकातील पोलीस अधिकारी यांना माहिती मिळाली की, फार्म कॅफे, सर्व्हे नं.२२४, औंध-बाणेर लिंक रोड, बाणेर येथील शेतामध्ये अनाधिकृतपणे हुक्का बार चालु आहे मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता कॅफेमध्ये ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरीत्या तंबाखुजन्य हुक्का पुरवून व जवळ बाळगुन हुक्का बार चालवित असताना मिळुन आल्याने यामध्ये पाच
               आरोपी विरुध्द त्यामध्ये जागा मालक व मॅनेजर व कामगार यांचेविरुध्द चतुः श्रृंगी पोलीस स्टेशनला सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन त्यामध्ये २० हुक्का पॉट, तबांखुजन्य हुक्का फ्लेवर व इतर साहित्य असा एकुण-४८,६५०/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला पुढील तपास हा सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे करत आहे
ही कामगिरी  अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विठठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आश्विनी ननावरे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, वाघेश कांबळे, तुषार गिरंगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *