थेऊर( हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांचा अवैधरित्या हातभट्टी गावठी दारू वाहतूक करणाऱ्या पिकअपवर सर्जिकल स्ट्राइक करत तब्बल दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लोणी काळभोर पोलिसांचा अवैधरित्या हातभट्टी वाहतूक विक्री करणाऱ्यावर कारवाईत गावठी हातभट्टी दारुची 35 लिटरचे 60 प्लास्टिकचे कॅन यामध्ये 2 हजार लीटर दारु एक पिकअप असा मिळून एकूण दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर ते कोलवडी रस्त्यावर थेऊरगावच्या हद्दीतील स्मशानभूमी जवळ गावठी दारूची वाहतूक करणारी गाडी जाणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारकडून थेऊर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार व दिगंबर सोनटक्के यांना मिळाली असता त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार मुळा मुठा नदी जवळ सापळा रचला यावेळी बातमी मिळालेल्या वर्णनाची पिकअप गाडी दिसली गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये कॅन आढळून आले त्यावर भुशाची पोती ठेवली होती त्याखाली दारुची कॅन होते पोलीसही या वाहतुकीच्या पद्धतीमुळे चक्रावून गेले यामध्ये अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या सोमनाथ सुरेश राखपसरे ( वय २९रा.दहिटणे ता.दौड) याला ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, पोलिस हवालदार दिगंबर जगताप,अमोल जाधव,मल्हारी ढमढेरे , दत्तात्रय गोगाणे, दत्तात्रय तेलंगे यांनी केली.
