थेऊर -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांनी ५ धारदार कोयत्यासह तडीपार गुन्हेगार व इतर ३ गुन्हेगारांना केली अटक
लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे आदेशान्वये तपास पथक अधिकारी कृष्णा बाबर व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार हे लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार इसम व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना गोपनिय बातमीदरामार्फत घोरपडेवस्ती लोणी काळभोर परिसरात ३ इसम त्यांचेजवळ कोयते बाळगुन ट्रीपलसीट दुचाकी गाडीवरुन अंबीका माता मंदिराच्या दिशेने जातअसल्याची खबर मिाली मिळालेल्या बातमीनुसार तपास पथक अंबिका माता मंदिर परिसरात गेले असता एका दुचाकी गाडीवरुन ३ तीन जणांना हटकताच गाडी जोरात पळवू लागले त्यावेळी लोणी काळभोर पोलीसांनी अतिशय कौशल्यपुर्ण रित्या संशयीत इसम जात असलेल्या रोड चे चौहुबाजुंनी त्यांची घेरेबंदी करुन त्यांना अंबिका माता मंदिर कदमवाकवस्ती येथे पाठलाग करुन पकडले.त्यावेळी त्यांच्या ताब्यातील तब्बल ४ धारदार कोयते पोलिसांनी जप्त केले यात प्रकाश काळु कांबळे, (वय २० वर्षे, रा. काका पवार तालीम जवळ, फ्लॅट नं. ४०६, विघ्नहर्ता सोसा. जांभुळवाडी, कात्रज) मयुरेश्वर दत्तात्रय इटकर, (वय १८ वर्षे, रा. कुमजाई माता मंदिरा जवळ, खांडगेवस्ती, टेकवडी गाव) अक्षण रविंद्र चव्हाण,( वय १८ वर्षे, रा. काका पवार तालीम जवळ, फ्लॅट नं. ६०३, विघ्नहर्ता सोसा. जांभुळवाडी, कात्रज) यांच्याकडील ४ कोयते, दुचाकी गाडी मोबाईल असा १,४१,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
त्याचप्रमाणे लोणी काळभोर पोलीसांनी लोणी काळभोर गावच्या स्मशानभूमीत तडीपार असलेला रोहित महादेव पाटील, (वय-२१ वर्ष रा. खोकलाईदेवी चौक, लोणी काळभोर) हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे लोखंडी कोयता सापडला असुन याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक पुजा माळी, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस अंमलदार चक्रधर शिरगीरे, योगेश पाटील, राहुल कर्डीले, प्रविण दडस, गणेश सातपुते, रामहरी वणवे, आण्णा माने, संभाजी देवीकर, शैलेश कुदळे, बाजिराव विर, चेतन कुंभार, प्रदिप गाडे, सचिन सोनवणे, अशोक गिरी, यांनी केली
