पुणे (हवेलीनामा वृत्तसेवा) नारायणगाव एस टी स्टँड परिसरात तीन संशयितांना तीन गावठी पिस्तुल, नऊ काडतूसासह ताब्यात घेऊन मोटार सायकलसह एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तीन जणांनावर कारवाई केली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेचे पथक संयुक्तरित्या अवैध गावठी पिस्तुल तस्करी करणाऱ्या, बाळगणारे, खरेदी विक्री करणारे गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस शिपाई ओंकार शिंदे, मोसीन शेख यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की नारायणगाव एस.टी.स्टँड परिसरात एका स्प्लेंडर मोटार सायकलवर तीन इसम संशयित रित्या फिरत असून त्यांच्या जवळ गावठी पिस्तुल आहेत अशी माहिती मिळताच तपास पथकाने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने नारायणगाव एस.टी. स्टैंड परिसरातून धनंजय चक्रधर साळुंखे( वय २० वर्षे, रा. कारेगाव ता शिरूर) सुरज आप्पासाहेब कर्डीले (वय १८ वर्षे, रा. रामलिंग शिरूर ता शिरूर) अनमोल दादाभाऊ जाधव, (वय २७ वर्षे, रा. कारेगाव ता शिरूर ) या तिघांना ताब्यात घेतला असता त्यांचयाकडे अवैध रित्या बाळगलेली एकूण तीन गावठी पिस्तुल, नऊ जिवंत काडतूस व मोटार सायकल असा एकूण १,७५,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.यातील आरोपीं धनंजय साळुंखे याचेवर यापूर्वी शरीराविरूद्धचा दुखापतीचा एक गुन्हा दाखल आहे.
