थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) मैदानी खेळात ग्रामीण भागातील मुलांचा दिवसेंदिवस वाढत असलेला सहभाग ही चांगली गोष्ट असून यामुळे शरीराचा व्यायाम होऊन शरीर तंदुरुस्त राहते कुस्ती कबड्डी मल्लखांब क्रिकेट हा ग्रामीण भागातील तरुणांना संघटित करणारे खेळ असून यातून अनेक खेळाडू तयार होत आहेत प्रत्येक गावात क्रिकेट स्पर्धाचे आयोजन होत असून हवेली तालुका सध्या क्रिकेट प्रेमी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यामुळे भविष्यात ग्रामीण भागातील तरुणांच भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करेल असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला
जिल्हा पातळी राज्य पातळीवर नेणारे खेळ असून क्रिकेट हा ग्रामीण भागातील तरुणांना संघटित करणारा खेळ असल्याचे मत मांजरीचे माजी उपसरपंच प्रकाश सावंत यांनी व्यक्त केले थेऊर प्रीमियर लीग घ्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होते. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ४४ हजार रुपयांचे पारितोषिक युवानेते सुजित काळे व युवा उद्योजक योगेश काकडे यांनी ठेवले होते, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य संजय काकडे यांनी ३३हजार रुपये ठेवले होते. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 22हजार रुपये यशवंत उघोग समूहाचे चेअरमन विनोद तुकाराम काकडे यांनी दिले चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य राहूल कांबळे यांनी ११हजार रुपये ठेवले होते तर सर्व विजेत्या संघांना चषक हवेली तालुका आरपीआयचे अध्यक्ष मारुती कांबळे यांनी दिले मैदानात मंडप व व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे सौजन्य ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी दिले मैदान तयार करण्यासाठी मांजरीचे माजी उपसरपंच प्रकाश सावंत यांनी सौजन्य दिले चेंडू व तर साहित्य यशवंतचे व्हाइस चेअरमन किशोर उंद्रे यांनी दिले
या स्पर्धेत सर्व सहा संघ गावातीलच होते अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर आयपीएल स्पर्धेत जसा खेळाडूंचा लिलाव केला जातो त्याच पद्धतीने ही स्पर्धा भरविण्यात आली होती सलग तीन दिवस सुरु होती यात फायनलला अतिशय अटीतटीच्या लढतीत विलास सोनवणे वॉरियर्स यांनी प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक संतोष काकडे वॉरियस ने मिळवला तिसरा क्रमांक गणेश चव्हाण वॉरियर्स ने मिळवला तर चौथा क्रमांक ऋतिक काळे वॉरियर्सने मिळवला स्पर्धेचे आयोजन गावात सर्व तरुणांनी एकत्र येऊन केले होते यात गावातील अनेक मान्यवर मंडळीनी बक्षीसे ठेवली होती.या स्पर्धेत चार क्रमांकाने रोख रक्कम तसेच चषक देण्यात आला तर मॅन ऑफ द मॅच, सिरीजसाठी तीन सायकल व ट्रॉफी देण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी विलास सोनवणे वॉरियर्स विरुद्ध संतोष काकडे वॉरियर्स यांच्यात झाली संतोष काकडे वॉरियर्स ने सहा षटकात ९०धावा केल्या जिंकण्यासाठी विलास सोनवणे वॉरियर्स ला सहा षटकात ९१धावांची गरज होती तुफान फटकेबाजी करत विलास सोनवणे वॉरियर्सने अतिशय चुरशीच्या सामन्यात ९०धावाचे आव्हान पार केले व थेऊर प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आले
यावेळी माजी उपसरपंच प्रकाश सावंत ग्रामपंचायत सदस्य संतोष काकडे, संजय काकडे,आरपीआयचे अध्यक्ष मारुती कांबळे, युवराज काकडे, सुजित काळे, योगेश काकडे, योगेश मुरकुटे,सुमित कुंजीर, छत्रपती सेवा संघाचे अध्यक्ष सागर राजगुरु, यशवंत बोराळे, विशाल चव्हाण, नितिन कुंजीर, व आयोजक विलास सोनवणे ,कुमार जाधव उपस्थित होते ही स्पर्धा चिंतामणी विद्या मंदिर मैदानावर घेण्यात आली होती यासाठी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे विशेष सहकार्य लाभले.
