पुणे (हवेलीनामा वृत्तसेवा) घरफोडी करून चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक करून त्याच्या कडून  ०५ गुन्हे उघडकीस आणून एकूण ७तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, १८० ग्रॅम वजनाची चांदीचे मुकुट, रोख रक्कम, मोटार सायकल, असा एकूण ८ लाख ५०हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पुणे ग्रामीणच्या
 गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशनला यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  विक्रम महादू डेरे (वय २० वर्षे, रा. मंगरूळ, ता. जुन्नर) हे घराला कुलुप लावून पारगाव येथे गेले असता भर दुपारी  कोणीतरी अज्ञात व्यक्तीने  घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून  घरातील कपाटातून सोन्याचे दागिने एकूण साडे तीन तोळे सोने चोरीला गेले याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल केला.
दिवाळी सणाचे सुरूवातीस जुन्नर, खेड उपविभागात दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. या  गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करण्यात आला. घटनास्थळांची पाहणी करून घटनांमध्ये सर्व बंद घरांमध्ये दिवसा चोरी झाली होती, गुन्हे पद्धत एक सारखीच होती. वरील गुन्हयामध्ये सुमारे १०० किमी पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गुन्हयामध्ये एका काळे रंगाचे मोटार सायकलवरील दोन संशयितांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले तसेच प्रत्येक घटनास्थळावरून संशयित मोटार सायकल ही अहिल्यानगर बाजूकडे गेली होती.
संशयित मोटार सायकलचा व आरोपीचा  शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गुन्हयातील संशयित मोटार सायकल ही युनिकॉर्न मोटार सायकल असून ती रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहन भिकाजी भोसले, किशोर हापूस भोसले दोघे (रा. कासाटी, आष्टी, जि बीड) हे वापरत असून त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितलले दोन्ही आरोपी आळेफाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने, आळेफाटा परिसरात पथकाने सापळा रचून आरोपी १) मोहन भिकाजी भोसले वय २० वर्षे, २) किशोर हापूस भोसले वय २० वर्षे, दोघे( रा. कासाटी, आष्टी, जि बीड) यास युनिकॉर्न मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे कडे चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना अधिक विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता, त्यांनी पाच घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली
 एकूण ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, १८० ग्रॅम वजनाचे चांदीचे मुकुट, रोख रक्कम, मोटार सयाकल असा एकूण सुमारे ८,५०,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,  अपर पोलीस अधीक्षक  रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,आळेफाटा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  विश्वास जाधव, मंचर पोलिस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण सपांगे  महोदव शेलार, अमित सिदपाटील, अंमलदार विक्रम तापकीर, दिपक साबळे, हेमंत विरोळे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, आळेफाटा पो स्टे चे श्रेणी पोसई सतिश टाव्हरे, अमित म्हाळुंजे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, नवीन आरगडे, गणेश जगताप, ओंकार खुणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *