दौड (हवेलीनामा प्रतिनिधी) पूर्व हवेलीतील उरळीकांचन येथे पुणे सोलापूर महामार्गावर रिलायन्स जिओ मार्ट समोर इरिगेशन वसाहतीकडे जाणाऱ्या चौकात एक महिला रस्ता पार करत असताना पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारीने पाठीमागून जोरात ठोसर मारली यात ती गंभीर जखमी झाली असून या महिलेस नागरिकांनी रुग्णवाहिकेस पाचरण करून उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उरळीकांचन या ठिकाणी कायमच वाहतूक कोंडी होत असते तसेच महामार्गावर नेहमीच वर्दळ असल्याने छोटे-मोठे अपघात घडत असतात आज अशीच एक महिला महामार्गावर रस्ता ओलांडत असताना पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या मोटारीने या महिलेस पाठीमागून जोरदार धडक दिली त्यामुळे ती महिला रस्त्यावर कोसळली या महिलेच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली त्यावेळी अपघात स्थळी असलेल्या नागरिकांनी धाव घेऊन त्या महिलेस रुग्णवाहिकेतून जवळच्याच एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले महिलेस रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्या ठिकाणी पोलीस पोहोचू शकले नव्हते.
