वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा) विद्युत रोहीत्र मधील तांब्याच्या तारा चोरणा-या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट ०६च्या पथकाने ताब्यात घेऊन २लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार ताकवणे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली विद्युत रोहित्र चोरी करणारा अंशुमन राम केवल यादव, (वय १९ वर्षे, रा. शिरुर बायपास रोड शिरुर, ता. शिरुर) हा हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळाली असता त्याला शिताफिने ताब्यात घेवुन त्यांच्याकडे रोहित्राबाबत चौकशी केली असता ट्रान्सफॉर्मर / रोहीत्र मधील तांब्याच्या तारा वाघोली लोणीकंद भागात त्याच्या साथीदारांसह रोहीत्रामधील तांब्याच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २,००,०००/-(दोन लाख) रुपये किमतींच्या रोहीत्रामधील तांब्याच्या तारा जप्त करुन वाघोली पोलिस स्टेशनचे ०२ गुन्हे, लोणीकाळभोर पोलिस स्टेशनचा ०१ गुन्हा व लोणीकंद पोलिस स्टेशनचा ०१ गुन्हा असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले
ही कामगीरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ६ कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, विनायक साळवे, गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली आहे.
