पुणे-( हवेलीनामा वृत्तसेवा) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेतल्या पोलीस उपनिरीक्षकला  ४६ लाख ५०हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून दोन कोटी रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती यातील ४६लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले
याबाबत एका ४८वर्षीय तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती याबाबत समर्थ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. लोकसेवक
प्रमोद रविंद्र चिंतामणी (वय 44 वर्ष, पोलीस उप निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, रा. फ्लॅट नंबर 504, सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी, पुणे, मुळ कर्जले हरियाळ ता. पारनेर, जि. अहिल्यानगर (वर्ग-2) याला अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्ध पत्राकानुसार  यातील तक्रारदार व्यवसायाने वकील असून त्यांचे आशिल यांच्याविरुद्ध बावधान पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यामध्ये आशिलांच्या वडिलांना सुद्धा अटक झाली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्याकडे आहे.या गुन्ह्यामध्ये तक्रारदारांच्या आशिलाला मदत करण्यासाठी व आशिलाच्या अटकेतील वडिलांच्या जामीन अर्जावर से दाखल करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक प्रमोद चिंतामणी, पोलीस उप निरीक्षक याने तक्रारदाराकडे स्वतःसाठी 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली होती.
यातील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 27/10/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणीमध्ये  तक्रारदार यांना त्यांच्या अशिलाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी व त्या गुन्ह्यात अटकेत असलेले आशिलाचे वडीलांना जामीन अर्जावर से देण्यासाठी स्वतःसाठी दोन लाखाच्या प्राथमिक लाच मागणीमध्ये अचानकपणे वाढ करून दोन कोटी रुपयांची लाच मागितली त्यापैकी एक कोटी स्वतःसाठी व त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक कोटी असे दोन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लोकसेवक यांनी तक्रारदाराकडे वरील कारणासाठी मागितलेल्या दोन कोटी रुपयांच्या लाच रकमेपैकी 50 लाख रुपयांचा पहिला हप्ता लवकरात लवकर देऊन उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले
 लाच मागणी पडताळणी केल्यानंतर आज दि.2/11/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक प्रमोद चिंतामणी याने उंटाड्या मारुती मंदिरासमोर, रस्ता पेठ, पुणे शहर येथे तक्रारदाराकडून लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान मागितलेल्या दोन कोटी रकमेतील 50 लाखाच्या पहिला हप्ता रक्कमेपैकी 46,50,000/-स्पयाची लाच तक्रारदाराकडून स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील,अर्जुन भोसले यांच्या  मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानचे पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारी,अविनाश घरबुडे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *