लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा ) पुणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या वतीने
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती व एकता दिनानिमीत्ताने एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती व राष्ट्रीय एकता दिनाचे औचीत्य साधुन पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने दि. ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ०७/०० वा. एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
एकता दौडमध्ये लोणी काळभोर परिसरातील जेष्ठ नागरिक, पूर्व हवेली असोसिएशन चे डॉक्टर्स, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, उप महाराष्ट्र केसरी भरत मस्के, मुंबई महापौर केसरी पै. दत्तात्रय (आबा) काळे, नॅशनल बॉक्सर चॅम्पियन कु. सृष्टी विजय जाधव त्याचप्रमाणे लोणी काळभोर व कदम वस्ती चे सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, खेळाडू, डान्स अकॅडमी चे विद्यार्थी, पंचक्रोशीतील बचत गटाच्या महिला तसेच लोणी काळभोर पोलीस स्टेशन, हडपसर वाहतूक विभाग व इतर ठिकाणी नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.
सुमारे ९८० सदस्य एकता दौडमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी पुरुष ६७२ व ३०८ महिला सदस्य सहभागी झाल्या होत्या. सदर एकता दौड सुमारे ३ कि. मी. अंतराची ठेवण्यात आली होती. सकाळी ०७/०० वा. लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथुन प्रथम पुरुष गटाची व नंतर महिला गटाची अशा दोन स्वतंत्र एकता दौड घेण्यात आल्या. पालखी मैदान, कदमवाकवस्ती येथे एकता दौड चे अंतीम टोक होते. एकता दौड मध्ये सहभागी झालेल्या सदस्यांपैकी ज्यांनी दौड पुर्ण करुन प्रथम आले अशा पुरुष गटातुन व महिला गटातुन प्रत्येकी ३ क्रमांक काढण्यात आले व त्यांना राष्ट्रीय स्तरावर क्रिडा पुरस्कार विजेते खेळाडु यांच्या हस्ते ट्राफी मेडल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पारितोषीक वितरणानंतर शालेय विद्यार्थ्यांचा विवीध गुणदर्शनपर कार्यक्रम पार पडला. एकता दौड माध्यमातुन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्र व त्यांच्या अमुल्य व ऐतिहासिक कामगीरीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी माहिती दिली. त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाखा स्मिता पाटील यांनी केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आजपर्यंतच्या इतिहासात लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत अशाप्रकारचे उत्कृष्ठ व नियोजनबध्द कार्यक्रमाचे आयोजन पोलीस प्रशासनाचे वतीने पहिल्यांदाच करण्यात आले असल्याची चर्चा, लोणी काळभोर व पंचक्रोषीतील नागरीकांमध्ये आहे. या कार्यक्रमाचे माध्यमातुन राष्ट्रीय एकता, सार्वभौमता व जातीय सलोखा याचे उत्तम दर्शन घडले. त्याबाबत सर्वत्र लोणी काळभोर पोलीसांचे तसेच पुणे शहर पोलीस दलाचे कौतुक केले जात आहे.
