लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा)लोणी काळभोर पोलीसांनी दुचाकी चोरटयाकडुन चोरीस गेलेली दुचाकी, अग्निशस्त्र व १० जिवंत काडतुसे असा एकूण ६२हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
लोणी काळभोर येथील राजेंद्र बबनराव काळभोर (वय ५५ वर्षे ) यांनी त्यांची दुचाकी अॅक्टीवा गाडी नंबर एम. एच. १२ क्यु. डी. ३२३३ ही लोणी काळभोर येथील स्मशानभुमीसमोर पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी गाडी चोरुन नेली होती.याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती
लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांचे पथकाने सतत ४ दिवसांमध्ये सुमारे १६५ कॅमेरे चेक करुन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी बिबवेवाडी चे दिशेने चोरीची मोटारसायकल घेवुन गेल्याचे निदर्शनास आले. प्राप्त माहितीनुसार लोणी काळभोर पोलीसांनी या भागामध्ये कौशल्यपुर्णरित्या आरोपीचा शोध घेतला असता आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती प्राप्त झाली असता तपास पथकाने
आरोपी अरुण बाबुराव देशमुख (वय ६७ वर्षे रा. श्रीनिवास सोसायटी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर,) याला ताब्यात घेवुन त्याच्याकडील चोरीस गेलेली अॅक्टीवा गाडी नंबर एम. एच. १२ क्यु. डी. ३२३३ ही दुचाकी जप्त केली यावेळी आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे लक्षात आल्याने त्यांच्या घराची झडती घेतली असता एका बॅग मध्ये एक अग्निशस्त्र (रिव्हॉल्वर), १० जिवंत काडतुसे व बनावट चाव्या असा एकूण ६२हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस अंमलदार सातपुते, शिरगिरे, कुदळे, पाटील, माने, विर, देवीकर, कुंभार, गाडे, राहूल कर्डीले, सोनवणे, दडस, गिरी, यांनी केली आहे.
