पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) लाचलुचपत प्रतिबंधक  पुणे विभागाकडून सातारा येथील माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक वैशाली शंकर माने( वय 40 वर्ष, वरिष्ठ सहायक, माध्यमिक शिक्षण विभाग, सातारा (वर्ग-3)) यांच्यावर पंचवीस हजार (२५०००)रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
याबाबत एका ६२वर्षाच्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्ध पत्रानुसार  यातील तक्रारदार हे सेवानिवृत शिक्षक असुन त्यांचा २४ वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण असलेला निवड श्रेणी प्रस्ताव त्यांच्या शाळेने शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे दाखल केला होता. प्रस्तावाच्या मंजूरी आदेशाच्या मागणीसंदर्भात तक्रारदार हे क्लार्क श्रीमती माने यांना भेटले असता  काम पूर्ण करण्यासाठी साहेबांना 25,000/- रुपये द्यावे लागतील असे सांगून 25,000/- रुपयाची लाच मागितली
यातील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 27/10/2025 रोजी लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणीमध्ये तक्रारदार यांच्या वरील कामासाठी शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभागातील श्रीमती वैशाली माने यांना भेटले असता त्यांनी  काम पूर्ण करण्यासाठी साहेबांना 25,000/- रुपये द्यावे लागतील असे सांगून 25,000/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
 यातील आरोपी लोकसेवक श्रीमती वैशाली शंकर माने, (वय 40 वर्ष, पद-वरिष्ठ सहायक, माध्य शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सातारा) यांनी शिक्षण आधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयात जिल्हा परिषद सातारा येथे तक्रारदाराकडून 25,000/- रुपयाची लाच स्वीकारली असताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे..
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक  शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांनी केली.
पुढील तपास सातारा लाचलूचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *