थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) थेऊर गावठाण मध्ये गेल्या काही दिवसापासून थोडा पाऊस पडला तरीही गावातील वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे महावितरण कडून देखभाल दुरुस्तीचे काम केले आहे का यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
थेऊरचे शाखा अभियंता यांची पाच महिन्यापूर्वी बदली झाल्याने हे पद रिक्त आहे तर येथील कार्यभार कुंजीरवाडीच्या अभियंता यांच्याकडे अतिरिक्त भार देण्यात आला आहे त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे.व्यवसायिकाची देखील मोठी अडचण होत आहे तसेच येथील श्री चिंतामणी गणपतीस येणाऱ्या भाविकांची देखील अडचण होता असल्याचे दिसते.
पुरवठा बंद असल्यास मोबाईल सेवा विस्कळीत होते त्यामुळे संपर्क करणे देखील अवघड होते. गेल्या काहीच दिवसापासून अशी परिस्थिती असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून समस्या सोडविण्यासाठी पावले उचलवीत अशी नागरिकांची मागणी आहे.
