थेऊर -( हवेलीनामा वृत्तसेवा) उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात ह. भ. प. जीवन महाराज शिंदे यांना युवकांसह जेष्ठ नागरिकांची पंसती
उरुळी कांचन जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती साठी आरक्षित झाल्याने अचानकच सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित व शिक्षकी पेशा असलेले व महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे शिक्षक तसेच कीर्तनकार जीवन महाराज शिंदे यांना जिल्हा परिषद सदस्य पदासाठीच्या होणाऱ्या निवडणूकांसाठी पाठिंबा वाढत आहे सर्व पक्षीय संबंध व सर्वसामान्य नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाशी आधुनिक नाळ ठेवून असलेले व स्थानिक राजकारणाशी संबंधित असलेल्या मातब्बर मंडळींशी डायरेक्ट संबंध असणारे कुशल विचारवंत धर्मिक राजकीय कला क्रीडा सांस्कृतिक विभाग सामाजिक कार्यात कायम अग्रेसर आहेत. असा सर्वगुणसंपन्न उमेदवार जिल्हा परिषद उरुळी कांचन गटात असावा असा स्थानिक नागरिकांचा कल आहे. जिल्हा परिषद उरुळी कांचन गटात सध्या जीवन शिंदे यांना मतदारांचा प्रतिसाद वाढत आहे
पंधरा वर्षे पुरोगामी माध्यमिक विद्यालयात नौकरी केली असल्यामुळे तरडे, सोरतापवाडी, वळती, शिंदवणे येथील मुले या शाळेत शिकलेले असल्यामुळे या भागातील घरोघरी त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यावेळेचे विद्यार्थी आताचा युवा मतदार यामुळे या निवडणूकीत शिंदे यांना यांचा फायदा होणार असे जाणकारांचे म्हणणे आहे.सध्या ते चिंतामणी
विद्या मंदिर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आपल्या सदैव हसतमुख चेहऱ्यासाठी व हजर जबाबी पणासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे पहिल्यांदाच उरुळी कांचन येथील नागरिकांना एक स्वच्छ प्रतिमा असलेला चेहरा जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांच्यातील उमेदवार म्हणून पुढे येत आहेत
गावपातळीवर सर्व गटांशी एकरुप असून वारकरी संप्रदाय ही त्यांची जमेची बाजू असून शैक्षणिक क्षेत्रातील तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीची योग्य रितीने मांडणी करुन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासनिधी खेचून आणून उरुळी कांचन गावचा सर्वांगिण विकास करतील अशी धारणा जिल्हा परिषद गटातील नागरिकांचे म्हणणे आहे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून सोईसुविधा व मराठी शाळेत विद्यार्थ्यांची लोकसंख्या वाढीच्या धोरणात त्यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शिंदे महाराजांचा चेहरा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी योग्य वाटत आहे सध्या शिंदे हे महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेल्या डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संचालक म्हणून काम पाहत आहेत ही त्यांची जमेची बाजू आहे कारण ही संस्था उरुळी कांचन मधील स्थानिक राजकारणातील महत्वाचा दुवा आहे तसेच त्यांचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन व डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन राजेंद्र कांचन यांच्याशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध हे देखील त्यांना येत्या निवडणुकीत फायदेशीर ठरणार आहेत स्थानिक राजकारणात कांचन फॅक्टर महत्वाचा ठरणार असून याचा फायदा ज्या उमेदवाराला होईल तोच जिल्हा परिषद गटात विजयी होणार अशी परिस्थिती सध्या तरी दिसत आहे सर्वाना सोबत घेऊन वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करुन तरुण पिढीला तसेच जेष्ठ नागरिकांना सध्या तरी आकर्षित वाटणारा चेहरा म्हणून जीवन महाराज शिंदे यांच्या नावाला जिल्हा परिषद उरुळी कांचन गटात पसंती मिळत आहे
इतिहासात प्रथमच जीवन महाराज शिंदे यांच्या रूपाने उरुळी कांचन गटात एक समाज प्रबोधन करणारा कीर्तनकार व समाज सुधारण्यासठी आपले योगदान देणारा चेहरा म्हणून शिंदे यांचं नाव पुढे येत आहे.राज्यात गावोगावी शरद मल्हार महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मध्ये राष्ट्रप्रेम व संगीताची आवड निर्माण होण्यासाठी राज्यभर शरद मल्हार महोत्सव यशस्वी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.पुरस्कारांमध्ये चिंचवड देवस्थान चा मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, किर्तन क्षेत्रातील समाजभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.यानिमित्ताने या जिल्हा परिषद गटात अमुलाग्र बदल होऊन नागरिकांची कामे होतील असा विश्वास नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.
