थेऊर (हवेलीनामा) येथील श्री चिंतामणी गणपती मंदिर मंदिरातील गाभाऱ्याच्या कामाचे कारण पुढे करत जवळपास एक महिन्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत असून यामुळे भाविकांमध्ये याबद्दल तीव्र विरोध असल्याचे दिसते. येत्या काही दिवसात अधिक मास प्रारंभ होत असून हिंदू धर्मानुसार या महिन्यात देवदर्शनाला अधिक महत्व आहे त्यामुळे मोठमोठ्या तीर्थयात्रांचे आयोजन करण्यात येते . श्री क्षेत्र थेऊर हे अष्टविनायकांपैकी एक असल्याने या ठिकाणी राज्यासह देशाच्या विविध राज्यांमधून श्री गणपती दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात अशा धार्मिक अधिक मास कालावधीमध्ये येथील मंदिर बंद करण्याचा हा निर्णय भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणारा असल्याचा तीव्र प्रतिक्रिया पुढे येत आहेत

श्रीक्षेत्र थेऊर या ठिकाणी श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुख सोयींकडे सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ मंदिर सुशोभीकरण याकडे विशेष लक्ष देऊन शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत अशावेळी येथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधांकडे शासनाचे लक्ष का नाही विशेष म्हणजे धर्मादाय आयुक्त यांनी तीर्थक्षेत्र थेऊर या ठिकाणी येऊन भाविकांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला या मंदिरात आल्यानंतर दर्शन बारी सह पिण्यासाठी शुद्ध पाण्याची देखील उपलब्धता नाही तसेच स्वच्छतागृहाची संख्या अत्यल्प असल्याने हजारो भाविकांच्या अडचणी वाढत आहे अशा वेळी शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीचा वापर भक्तांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होणे आवश्यक होते परंतु त्या ऐवजी मंदिर सुशोभीकरण यावरच पुरातत्त्व विभागाने लक्ष दिल्याचे दिसून येते.

मुख्य मंदिर गाभाऱ्याचे काम करणे असल्याचे कारण पुढे करून जवळपास एक महिना मंदिर दर्शनासाठी बंद करण्याचा शासकीय निर्णय येत असल्याचे समजते त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी असून यापूर्वी हे मंदिर कधीही बंद झालेले नव्हते केवळ कोरोना काळात सर्व देशातील मंदिरे बंद असल्याने त्यावेळी हे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते त्यानंतर या मंदिरात आजतागायत कोणत्याही कामासाठी ही मंदिर बंद करण्यात आले नाही मग आताच ही मंदिर बंद का करायचे असा सवाल स्थानिक नागरिकांनी देखील केला आहे त्यामुळे या निर्णयाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत असल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून येत आहे त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे केवळ चार-सहा जणांना एकत्र करून त्यांच्यासमोर आपला हा निर्णय ठेवणे हे कितपत योग्य आहे यासाठी ग्रामस्थांसह भाविकांशी चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *