पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी कंद पोलिसांनी १२० फ्रिज कंटेनरसह गायब करणाऱ्या आरोपीला नंदुरबार मधून ताब्यात घेऊन ३५लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव एम आय डी सी येथील भगवती ट्रान्सपोर्ट कंपनीचा कंटनेर ट्रक नंबर MH-12-TV-1024 मध्ये कटकेवाडी येथील मारुती वेअर हाऊस गोडाऊन मधून हायर कंपनीचे १२० फ्रिज घेऊन ते फ्रिज शिल्पा इलेक्टॉनिक्स, राजकोट, गुजरात येथे पोहच करण्यासाठी कंटनेर ट्रकवरील ड्रायव्हर घेवुन गेला होता परंतु शिल्पा इलेक्टॉनिक्स, राजकोट, गुजरात येथे कंटेनर ट्रक पोहचला नसल्याने तसेच कंटेनर ट्रक वरील ड्रायव्हरचा फोन बंद लागत असल्याने व कंटेनर ट्रकचे जीपीएस लोकेशन सुरत, गुजरात येथे एकाच ठिकाणी दाखवित असल्याने भगवती ट्रान्सपोर्ट कंपनीचे मॅनेजर यांनी जीपीएस लोकेशनवर दुसरा कंटेनर ट्रक ड्रायव्हरला पाठविले असता त्या ठिकाणी कंटेनर नव्हता त्यावेळी मॅनेजर यांना कंटनेर ट्रक ड्रायव्हरने कंटेनर ट्रक व त्यामधील माल गायब केला असल्याचे लक्षात आले कंटेनरसह १२० फ्रिज असा एकुण ३५,७९,६६०/- रुपये किंमतीच्या मालाचा अपहार झाल्याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता
लोणीकंद पोलिस कंटनेर ट्रकवरील ड्रायव्हरचा शोध घेत असताना अपहार झालेला कंटनेर ट्रक हा नंदुरबार येथील आर. के. पेट्रोलियम येथे असलेल्या बाबत यातील फिर्यादी यांनी माहिती दिली असता तपासपथक नंदुरबार येथे जाऊन आर. के. पेट्रोलियम येथे कंटनेर ट्रक नंबर MH-12-TV-1024 मिळला असता तो ताब्यात घेतला. तपासपथकाला गोपनीय बातमीदाराकडून कंटेनर ट्रक डायव्हरचा साथीदार यांची माहिती मिळाली असता आरोपी निसारअहमद इसाक खान, (वय ३५ वर्ष, रा. शास्त्री मार्केट, मंगल बाजार नंदुरबार) याला ताब्यात घेवुन त्याच्याकडून अपहार झालेले हायर कंपनीचे एकुण १२० फ्रिज एका खेडे गावातील घरातुन ताब्यात घेवुन एकुण ३५,७९,६६०/- रुपयांचा मुद्देमाल माल जप्त केला
ही कामगिरी. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४, सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक अर्जुन बेंदगुडे, पोलीस अंमलदार कैलास साळुंके, सागर जगताप, स्वप्निल जाधव, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, किरण पलांडे, अमोल ढोणे व सुधीर शिवले यांनी केली आहे.
