पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा )पुण्यात एसटीमध्ये गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे पाकीट व पर्सची चोरी करणा-या ०३ महिला आरोपींना युनिट ४च्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकी पोलीस स्टेशन हद्दीत युनिट-४, गुन्हे शाखेचे पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार प्रविण राजपुत व संजय आढारी यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की बसमध्ये गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरी करणाऱ्या ०३ महिला वाकडेवाडी येथे पीएमटी बसस्टॉपवर थांबलेल्या असल्याची बातमी मिळताच युनिट-४ चे पोलीस पथक वाकडेवाडी शिवाजीनगर येथील पीएमटी बसस्टॉपवर गेले असता मिळालेल्या गुप्त बातमीच्या वर्णनाच्या तीन महिला आशा देविदास लोंढे, (वय ६० वर्षे, रा.रेल्वे स्टेशन शेजारी, लोणी काळभोर) रेखा मनोहर हतागंळे, (वय ३५ वर्षे, रा. सदर) हेमा दिगंबर हातागंळे, (वय ४१ वर्षे, रा. सदर) याना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी नाशिक ते इस्लामपुर एसटी बसने मोरे बाग बसस्टँड ते मांगडेवाडी एसटी बस प्रवासा दरम्यान एसटी मधील गर्दीचा फायदा घेवुन एका महिलेची पर्स तिघींनी मिळुन चोरी केली असल्याचे कबुल केले. त्यांचेकडील रोख रक्कम १०००/- रुपये व सोन्याचे दागिने असा एकुण ४,१२,२३४/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास भारती विदयापीठ पोलीस स्टेशन करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ विजय कुभांर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-४, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार राजपुत, हरीष मोरे, एकनाथ जोशी, संजय आढारी, प्रविण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, भरत गुंडवाड, मयुरी नलावडे यांनी केली.
