थेऊर – (हवेलीनामा वृत्तसेवा) हवेली तालुक्यातील सहा पैकी थेऊर जिल्हा परिषद गटात चुरस मूळ नागरिकांचा प्रवर्ग ऐवजी कुणबी दाखले काढलेले प्रस्थापित जोरात त्यामुळे माधव पॅटर्न चालणार का याकडे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या नावाखाली बरीच मोठी उलथापालक अनुभवास येत असून नुकत्याच शासनाकडून निघालेल्या जीआर चा संदर्भ घेतल्यास इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागांवर परंपरागत इतर मागास प्रवर्गातील जातीतील लाभार्थी वंचितच राहणार असे चित्र सध्या दिसून येत आहे.
गेल्या काही निवडणुकांपासून प्रस्थापितांकडून परंपरागत मागास प्रवर्गातील जाती दुर्लक्षित होत असल्याचे निवडणुकीच्या संदर्भात दिसून येत आहे कारण प्रत्येक जागाही आपल्याच माध्यमातून लढवण्याचा अट्टाहास आणि त्यातून सामाजिक विषमता वाढीस हातभार लागत असल्याचे दिसते इतर मागास प्रवर्गातून परंपरागत असलेल्या 18 पगड जातीमधील उमेदवार प्रस्थापितांच्या भाऊ गर्दीत पाचोळ्या सारखा बाजूला फेकला जात आहे याची सल या प्रवर्गातील परंपरागत मतदारांच्या मनात कुठेतरी जागा धरून आहे यावर या अठरापगड जातीमधील प्रत्येक प्रत्येकानी जर विचार केला तर प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवणे शक्य आहे परंतु सध्या प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या प्रलोभनांच्या माध्यमातून या जातींमध्ये मतदार येनकेन प्रकारे आपल्या बाजूने झुकवण्यासाठी संपत्ती आणि दडपशाही याच्या माध्यमातून वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चढाहूड लागलेली आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील आरक्षित जागांवर त्याच प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा फायदा होतो परंतु गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये ज्या ज्या ठिकाणी इतर मागास प्रवर्ग या आरक्षित जागेवर हा परंपरागत वंचितच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.
पूर्व हवेलीतील थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट हा इतर मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित झाला असून या जागेवर अनेकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे या गटामधून वीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषद आरक्षणामध्ये इतर मागास प्रवर्गासाठी परंपरागत उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यावेळी लक्ष्मण केसकर यांनी बाजी मारत जिल्हा परिषदेवर निवडून गेले.
आता तब्बल वीस वर्षानंतर पुन्हा हा जिल्हा परिषद गट इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव म्हणून आरक्षित झाला असल्याने यावेळी देखील या गटातील थेऊर कुंजीरवाडी आळंदी म्हातोबा कोलवडी मांजरी खुर्द व आव्हाडवाडी या गावांमधून इतर मागास प्रवर्गातील उमेदवारच निवडून यावा यासाठी परंपरागत या प्रवर्गातील जातींमधून उमेदवार निवडला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे कारण संपूर्ण राज्यात सध्या चर्चेत असलेला विषय हाच असून ओबीसींचा यलगार सर्वत्र दिसून येत आहे अशा वेळी या गटातील ओबीसीचा सुज्ञ मतदार हाच विचार करणार की सध्या चालू असलेल्या वरदळीत भरकटला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *