उरुळी कांचन-(हवेलीनामा वृत्तसेवा) उरूळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तरुणीच्या खून प्रकरणी एका आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व उरूळीकांचन पोलीसांना यश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरेगाव हद्दीतील कोरेगाव प्रयागधाम रस्त्यावर पूनम ठाकूर (वय २० वर्षे व्यवसाय नोकरी, रा. गगण आकांक्षा सोसायटी कोरेगाव मुळ) हिचा संध्याकाळच्या सुमारास दगडाने ठेचून खून करण्यात आला होता तिच्या मृतदेह जवळ मोबाईल फोन, चप्पल, सॅक, पडलेली होती तिच्या डोक्याला गंभीर दुखपत होऊन रक्त सांडलेले होते तिचा कोणातरी अज्ञात व्यक्तीने खून केला होता त्याबाबत तिचा भाऊ
मनिष विनोद ठाकूर वय २३ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. गगण आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मुळ याने फिर्याद दिली होती घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व उरूळी कांचन पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार यांची चार पथके तयार करणेत आली. तपास पथकांनी घटनास्थळापासून जाणारे येणारे रोडवरील सुमारे ६०-७० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मयत मुलीचे संपर्कातील तसेच परिसरातील सुमारे २००-२५० व्यक्तींकडे तपास करण्यात आला गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षकांनी पुन्हा सर्व तपास पथकांची बैठक घेवून तपासातील प्रगती जाणून घेतली आणि महत्त्वाच्या सुचना केल्या त्याप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना एक संशयित व्यक्ती मोटार सायकलवरून घटनास्थळाच्या दिशेने जाताना दिसला, परंतु तो घटनास्थळापासून पुढे गेल्याचे आढळून आले नाही. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज हे परिसरातील गोपनीय बातमीदार तसेच नागरीकांना दाखविणेत आले, गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, फुटेज मधील संशयित व्यक्ती हा दिनेश संजय पाटोळे( रा. गोळेवस्ती उरूळीकांचन )हा आहे, अशी माहिती मिळाली.
तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनेश पाटोळे वर लक्ष केंद्रीत करून त्याच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले, त्याच्या दिनक्रमात व हालचालींमध्ये संशय वाटल्याने आरोपी दिनेश संजय पाटोळे (वय २६ वर्षे, रा. गोळेवस्ती उरूळीकांचन) यास ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले गुन्हयातील मयत युवती ही रोडने एकटी पायी चालत जात असल्याचे पाहिले आणि तिचा पाठलाग करून आरोपीने तिचेकडे शरीर सुखाची मागणी केली, मुलीने नकार देवून विरोध केल्याने आरोपीने तिचे तोंड दाबून झुडूपात नेले परंतु युवतीने आरडा ओरडा केला त्यामुळे आरोपीने रागाचे भरात तिच्या डोक्यात दगड मारला आणि युवतीचा खून केला. असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर एम.एच.१२ एस. झेङ ६९६५ ही जप्त करणेत आली
ही कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उरुळी कांचन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन
वांगडे,सहाय्यक पोलिस ज्ञानेश्वर बाजीगरे, दत्ताजीराव मोहिते, पोलिस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, ईश्वर जाधव, अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शेख, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, राजु मोमीण, अतुल डेरे, धिरज जाधव, भारत मोहोळ, रमेश भोसले, सुनील सस्ते, अजित काळे, कमलेश होले, विशाल रासकर, उद्धव गायकवाड, प्रशांत पवार, प्रविण चौधर, निलेश जाधव, सचिन जगताप, हरिश शितोळे, सुजाता भुजबळ, सावित्रा सांगडे, सुमित वाघ, दिपक यादव, सोमनाथ सुपेकर, सुवर्णा गायकवाड, ऋषीकेश रासकर, अश्वजीत मोहोड, अमोल खांडेकर, अमोल राउत, राजकुमार भिसे यांनी केली असून पुढील तपास उरूळीकांचन
