पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) बंडगार्डन पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपींकडुन चोरीचे आठ गुन्हे उघडकीस करुन १९मोबाईल फोन असा एकुण ३ लाख२३हजार रुपयांच्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
 फिर्यादी  साधुवासवानी चौकात थांबलेले असताना आरोपींनी दुचाकी वरुन येवुन फिर्यादी यांचा हातातील मोबाईल फोन हिसका मारुन  चोरुन नेला याबाबत बंडगार्डन पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेची गंभीर दखल घेऊन बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी तपास पथकाला दाखल गुन्ह्यांच्या शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना तांत्रीक तपास व सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असताना प्रदिप शितोळे, सारस साळवी व प्रकाश आव्हाड यांना सदरचा आरोपी हे कोंढवा परीसरातील असल्याची खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने मिळालेल्या बातमी प्रमाणे आरोपींचा कोंढवा भागात शोध घेत असताना आरोपी हे शिवनेरी नगर भागात राहणारे असल्याचे तांत्रीक तपासावरुन निष्पन्न झाल्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी  सोहेल बादशाह खान (वय २० वर्षे रा. गल्ली नंबर ०८, शिवनेरी नगर, कोंढवा), आयान झाकीर शहा (वय २१ वर्षे रा. गल्ली नंबर ०९, शिवनेरी नगर, कोंढवा), फरहान वसीम शेख (वय २० वर्षे रा. गल्ली नंबर ०४, शिवनेरी नगर, कोंढवा) यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले यातील आरोपी क्र.०१ व ०२ यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे विविध कंपन्याचे एकुण १९ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून शहरातील बंडगार्डन पोलीस ठाणे, वानवडी पोलीस ठाणे, कोंढवा पोलीस ठाणे, मार्केटयार्ड पोलीस ठाणे, स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतील ०८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले त्यांच्या कडून १९ मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेली दुचाकी वाहन असा एकुण ३,२३,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून उर्वरीत मोबाईल बाबत तपास चालु आहे.
ही कामगिरी  अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभागाचे राजेंद्र बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ चे मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संगिता आल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) निलकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, मोहन काळे, पोलिस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, सागर घोरपडे, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, अवधूत जमदाडे, निलेश पालवे, प्रविण पाडाळे, यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *