लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा) ऐन सणासुदीत पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या जेके सेल्स इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला लागलेल्या आगीत जवळपास २ कोटीं रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. जेके सेल्सच्या गोडाऊनला रविवारी(दि. १९) रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत जवळपास २ कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून गेल्या आहेत यामुळे दिवाळीच्या तोंडावर दुकानदारावर मोठे संकट कोसळले दुकान मालक अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी या दोघांची भागीदारीत दुकान असून दुकानातून टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, कुलर, एसी, पिठाची गिरणी, फॅन, गिझर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री केली जाते. या दुकानाचे गोडाऊन शिवम हॉस्पिटलच्या रस्त्यावर आहे. या गोडावूनमध्ये अंदाजे २ कोटींहून अधिक रुपयांचा माल ठेवलेला होता नागरिकांना गोडाऊनच्या बाहेर वायरचे शॉर्टसर्किट झाल्याचे रविवारी रात्री आढळून आले. आणि गोडाऊनच्या दिशेने जाणारी वायर जळत असताना दिसली. त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती तत्काळ जेके सेल्सचे संचालक अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी यांना दिली. घटनास्थळावर पोहचेपर्यंत गोडाऊनच्या शटर मधुन मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत होता. आगीच्या लाटा बाहेर पडत होत्या या घटनेची माहिती हडपसर येथील अग्निशामक दलाला देण्यात आली. तोपर्यंत नागरिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला.आग विजत नव्हती शेवटी जेके सेल्सच्या संचालक आणि कामगारांनी गोडावूनचे चारही शटर तोडून टाकले. आणि वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व वस्तूंनी पेट घेतला होता.यादरम्यान, फ्रीजमधील गॅसचा स्फोट झाला. त्यावेळी नागरिकांची पळापळ झाली. त्यानंतर अर्ध्या तासानंतर हडपसर येथील अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला परंतु, आग पूर्णपणे आटोक्यात आली नव्हती. त्यानंतर अग्निशामक दलाची दुसरी गाडी बोलावण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग पूर्णपणे विझविण्यात यश आले मागील महिन्यात पुराच्या पाण्यामुळे गोडाऊन मध्ये पाणी शिरुन ३ कोटींचे झाले होते.
