लोणी काळभोर-(हवेलीनामा वृत्तसेवा) पूर्व हवेली तील लोणी काळभोर येथील लोणी काळभोर रामदरा रस्ता चार पाच महिन्यांतच खड्डेमय झाला असून त्यावर डागडुजी करण्यात आली ती देखील माती मिश्रित मुरूम टाकून यावर शिवसेनेचे संतोष भोसले यांनी संताप व्यक्त करुन निकृष्ट रस्त्याची पोलखोल केलीय जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला होता चार पाच महिन्यांत रस्ता खराब होतोच कसा यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून हा ठेकेदार प्रशासन काळ्या यादीत टाकणार का याकडे आता नागरिकांची लक्ष लागून राहिली आहे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत लोणी
काळभोर गाव ते तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्याचे तब्बल २ कोटी ८८ लाखांचे काम चार पाच महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले होते परंतु आता रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून सर्वत्र खड्डे पडले आहेत. नव्याने घातलेला डांबराचा थर उखडून गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.नागरिकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अतिशय कडक शिस्तीचे असणाऱ्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व विकास कामात नेहमीच बारकावे शोधून कॉन्ट्रॅक्टरला झोपणारे अजित पवार या रस्त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करणार का याकडे आता लोणी काळभोर वाशी यांचे लक्ष लागून राहिले आहे.
या निकृष्ट कामाबद्दल शिवसेना शहरप्रमुख संतोष भोसले तसेच स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याची दुरुस्ती सुरु करण्यात आली असली तरी काम दर्जाहीन व चुकीच्या पद्धतीने होत असल्याने नागरिकांनी ते
थांबवले आहे. भोसले म्हणाले, अवघ्या चार पाच महिन्यांत रस्ता खड्डेमय होणे म्हणजे सरळसरळ भ्रष्टाचाराचे द्योतक आहे. एवढ्या मोठ्या निधीचा अपव्यय करून नागरिकांची फसवणूक झाली आहे, याची चौकशी करून जबाबदार अधिकारी व ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गापासून रामदरा हे तीर्थक्षेत्र सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर असून या मार्गाने दररोज हजारो भाविक प्रवास करतात. तसेच लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोळपे, केसकर, रुपनर, ढेले वस्ती तसेच फुरसुंगी रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्यांसाठी हा मुख्य मार्ग आहे. अल्पावधीतच खराब झालेल्या या रस्त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून कंत्राटदाराकडून केवळ थकीत बिलासाठी मलमपट्टी केली जात असल्याची चर्चा आहे.
रस्त्याच्या डागडुजीचे काम दर्जेदार व शास्त्रीय पद्धतीने करण्यात यावे, जेणेकरून भाविकांना स्थानिकांना पुन्हा त्रास सहन करावा लागू नये.
