पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा)  फायटर कोंबड्यांची पैशांवर झुंज लावुन जुगार खेळणाऱ्या व कोंबड्यांना क्रूरपणे वागणुक देणा-या ६ आरोपींना वानवडी पोलिसांनी केली अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना, तपास पथकाचे पोलीस अंमलदार गोपाळ मदने व अमोल पिलाणे यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली इम्प्रेस गार्डनच्या पाठीमागे, बंगला नंबर २ जवळ, रस्त्यालगत मोकळया जागेत, घोरपडी येथे सार्वजनिक ठिकाणी पाच ते सहा इसम हे पैशावर कोंबड्याची झुंज लावुन, त्यावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली असता मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी स्थळी छापा मारला असता सहा इसम कोंबड्यांची पैशावर झुंज लावुन त्यावर पैशाची बाजी लावुन हार जीतचा खेळ खेळत असताना अमोल सदाशिव खुर्द (वय ४७ वर्षे रा. रविवार पेठ)  मंगेश आप्पा चव्हाण (वय ५५ वर्षे रा. भवानी पेठ) निखिल मनिष त्रिभुवन (वय २० वर्षे रा. घोरपडी)  अमिर आयुब खान, (वय २८ वर्षे रा. घोरपडीगांव) सचिन सदाशिव कांबळे (वय ४२ वर्षे रा. भवानी पेठ)  प्रणेश गणेश पॅरम, (वय २७ वर्षे रा. कॅम्प) यांना ताब्यात घेतले ६ रंगीबेरंगी कोंबडे व त्यांची ने-आण करण्यासाठी आरोपीनी वापरलेल्या तंगुसच्या ६ पिशव्या, ३ मोटारसायकल, ५ मोबाईल हॅन्डसेट, २५८०/-रुपये रोख रक्कम असा एकुण ५,११,८८०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून जुगार व प्राण्यांना क्रूरपणे वागणुक देण्यास प्रतिबंध नुसार गुन्हा दाखल करण्यात आला
 कारवाई ही  अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग  मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५  डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजयकुमार डोके यांच्या सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, आशिष कांबळे, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले, अर्षद सय्यद व सुजाता फुलसुंदर या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *