स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक पडघम वाजू लागल्याने सर्वत्र राजकीय वर्दळ वाढण्याचे दिसून येत आहे मतदारांना प्रभावित करण्याच्या नानाविध कल्पना विशेष करून प्रलोभनांचा अवलंब करण्यात येत आहे नुकत्याच या निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण जाहीर झाल्यानंतर थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये असलेल्या नागरिकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवनवीन गिफ्ट यात स्वीट फराळ तसेच महिलांसाठी साड्यांचेही वाटप चालू आहे यातून उमेदवार आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
निवडणुकांच्या तारखा आणखी जाहीर झालेल्या नसल्या तरीही आपणच या निवडणुकीत उमेदवार असल्याचे जाहीर करून मतदारांचे उंबरठे भिजवण्याचे कार्य चालू झाले आहे प्रत्येक गावातील वाड्यावर त्या येथे जाऊन गाठीभेटी घेत आपल्याला या निवडणुकीत संधी द्यावी अशा प्रकारची विनंती केली जात आहे.
अलीकडे निवडणुकीचे स्वरूपच बदलत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे कारण मतदारांना गृहीत धरून या निवडणुकीत नाना प्रकारच्या हमेशांचा याच्यात अवलंब केला जात आहे यामध्ये देवदर्शनासह सणासुदीच्या दिवसात लागणाऱ्या मिठाई वाटपापासून ते लाडक्या बहिणींना दिवाळी भेट अर्थात भाऊबीज म्हणून साड्यांचे वाटप चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *