थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा)पूर्व हवेलीत पावसाने मागील महिन्यात हाहाकार करुन प्रचंड नुकसान झाले होते यात गोरगरीब कुटुंबाच्या घरात पाणी शिरुन संसाराचे अतोनात नुकसान झाले यात थेऊर येथील रुके वस्ती येथे ढग फुटी सदृश्य पाऊस पडून नैसर्गिक आपत्ती दरम्यान त्या भागातील रहिवासी नागरिकांचे घरांमध्ये पुराचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याची दखल घेऊन लोणी काळभोर पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत आपत्तीग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात व आलेल्या दीपावलीच्या सणात आनंदाचा क्षण अनुभवास मदत झाली अहिं दीपावलीच्या धामधुमीत मिळालेली पोलिसांकडील ही मदत नागरिकांना अतिशय मोलाची ठरल्याची परिसरात चर्चा आहे लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने मदत म्हणून दिवाळीचे शुभ मुहूर्तावर लोणी काळभोर पोलिसांनी एकत्रितरीत्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कडून वर्गणी गोळा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती स्मिता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सदर वर्गणी रकमेतून रुके वस्ती येथील तब्बल 28 कुटुंबीयांना शिधावाटप तसेच दिवाळीचे साहित्य व मिठाई वाटप केले. शिधा वाटपाचा कार्यक्रम दिनांक 18/ 10/ 2025 रोजी लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे हस्ते पार पडला.
