लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा) प्रवाशांची रिक्षात विसरलेली लॅपटॉपची बॅग रिक्षाचालक मोहन चंदनशिवे यांने केली परत परिसरात रिक्षा चालकांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एम. आय. टी. कॉर्नर येथुन एम. आय. टी. कॉलेज मध्ये इंजीनीअरींगचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अर्थ किशोर पिंपरे (रा. एम. आय. टी. कॉलेज हॉस्टेल, लोणी काळभोर) हा बकोरी फाटा, वाघोली येथे जाण्यासाठी रिक्षा नंबर एम. एच. १२ टी. यु. ०८२२ यामध्ये बसुन गेले असता बकोरी फाटा येथे उतरून वाघोलीच्या दिशेने निघुन गेले. थोडया अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले त्यांची लॅपटॉप ची बॅग रिक्षामध्येच विसरले परंतु त्यांचेकडे रिक्षानंबर नसल्याने ते पुढे काहीही करु शकले नाही.
त्यांनी पुन्हा लोणी काळभोरला आल्यावर लोणी काळभोर पोलीस स्टेशनला त्यांची लॅपटॉप बॅग रिक्षामध्ये विसरली असल्याचे सांगितले यावर लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर तसेच पोलीस अंमलदार राहुल कर्डीले, प्रशांत सुतार यांना एम. आय. टी. कॉर्नर भागातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक करण्याबाबत सूचना केल्या.त्याच दरम्यान रिक्षाचालक मोहन गणपती चंदनशिवे (वय ३२ वर्षे धंदा रिक्षा ड्रायवर रा. धुमाळमळा, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी अर्थ पिंपरे यांच्या मोबाईलवर फोन केला व त्यांची लॅपटॉप बॅग रिक्षा मध्ये असल्याचे सांगितले असता रिक्षाचालक व विद्यार्थी या दोघांनाही लोणी काळभोर पोलीस ठाणेस बोलावुन त्याबाबत अधिक माहिती घेतली असता, रिक्षाचालक यांना अर्थ पिंपरे यांनी गुगल पे व्दारे रिक्षाचे भाडे दिले होते. त्यामधील ट्रान्जक्शन आय. डी. वरुन त्यांनी त्यांचे मित्राच्या मदतीने अर्थ पिंपरे यांचा मोबाईल नंबर इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्राप्त केला व संपर्क साधुन लॅपटॉप बॅग लॅपटॉपसह प्रत केली.रिक्षा चालकाने माणुसकीच्या दृष्टीकोनातून इमानदारीचे लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार करुन त्यांचे कौतुक करण्यात आले
