पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा ) फुरसुंगी पोलिसांनी चोरटयाकडून १,२५,५०० रुपयांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त करुन चोरट्यास ठोकल्या बेड्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
फुरसुंगी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक महेश नलवडे, हवालदार हरिदास कदम, पोलीस अंमलदार तुकाराम गुरव, दयानंद कांबळे, महेंद्र सोरटे, रामकिशन हंवर्डे आणि प्रमोद ढाकणे दाखल गुन्ह्यांच्या तपासासाठी फिरत असताना पोलीस अंमलदार दयानंद कांवळे व महेंद्र सोरटे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली वडकी परिसरात महादेव मंदिराच्या पाठीमागे एक संशयित इसम कोणाचीतरी वाट पाहत थांबलेला असलेची माहिती मिळाली. असता पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता संशयीत वर्णनाचा इसम दिसून आला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने पाठलाग करून संशयित इसम प्रसाद राहूल यशवंत( वय २० वर्षे, रा. वडकीगाव, ता. हवेली) ताब्यात घेऊन त्यांच्या कडून गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालासह गुन्हयात वापरलेली अॅक्टीव्हा दुचाकी असा एकुण १,२५,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. दुचाकीवावत अधिक तपास केला असता ती चोरीची असून हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले एक घरफोडीचा व एक दुचाकी चोरीचा असे एकुण दोन गुन्हयांची उकल करण्यात फुरसुंगी पोलिसांना यश आले
ही कामगिरी परिमंडळ ५चे पोलिस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, फुरसुंगीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक विष्णू देशमुख, महेश नलवडे, तेहसिन वेग, पोलिस हवालदार हरिदास कदम, पोलिस अंमलदार दयानंद कांबळे, महेंद्र सोरटे, रामकिशन हंबर्डे, प्रमोद ढाकणे, तुकाराम गुरव, आणि कुंटेवाड यांचे पथकाने केली आहे.
