पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे पोलिसांच्या दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चा २०२४/२५चा आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार नुकताच जाहीर  झाला.हा पुरस्कार दी पुना डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह चे चेअरमन उदयकुमार काळभोर व संचालक मंडळाला मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.हा कार्यक्रम गोकर्ण महाबळेश्वर कर्नाटक येथे आयोजित करण्यात आला होता.
 या संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात२० जून१९२० रोजी झाली असून  २०/०६/२०२५ रोजी संस्थेस १०५ वर्ष पूर्ण झालेली आहेत. संस्थेचे सुमारे १५००० पोलीस अधिकारी व अंमलदार हे संस्थेचे सभासद आहेत. संस्थेचे भागभांडवल रुपये ४१०.११ कोटी आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त “राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार २०२४-२५” दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गोकर्ण महाबळेश्वर, कर्नाटक येथे आयोजित करण्यात आला होता.
या पुरस्कार सोहळयामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील संस्थानी सहभाग घेतलेला होता. या पुरस्कार सोहळयामध्ये दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेचे मुदत ठेव, कर्ज वितरण तसेच भागभांडवलामध्ये लक्षणीय वाढ झाल्याने त्याचप्रमाणे संस्थेचे १००% डिजिटलायझेशन करुन सर्व आर्थिक व्यवहार आणि सभासदांना तत्पर सुविधा प्रदान करण्यात अग्रेसर ठरल्याने संस्थेच्या अशा उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांचे वतीने संस्थेस “राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार २०२४-२५” प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. सदर पुरस्कार समारंभास पुणे पोलीस सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष  उदयकुमार काळभोर तसेच माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक  सागर घोरपडे यांनी संस्थेचे व संचालक मंडळाच्या वतीने पुरस्कार स्विकारला.संस्थेने सभासदांसाठी अनेक उपक्रम राबविले यात गुणवंत विद्यार्थी सन्मान करुन त्यांना बक्षिसे देऊन गुण गौरव केला तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचा सत्कार सोहळा तसेच पोलिस अधिकारी अंमलदार सभासदांसाठी २०लाख रुपयांचा अपघात सुरक्षा कवच मोफत विमा योजना राबविण्यात आली तसेच मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात येते
या  पुरस्कार सोहळयास प्रमुख उपस्थिती कर्नाटक चे खासदार प्रभाकर कोरे, अण्णासाहेब जोले, सहकारी पतसंस्था फेडरेशनचे डॉ संजय होसमठ,   महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे.माजी आमदार राहुल बोंद्रे, चंद्रशेखर सी.एस साो अध्यक्ष कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सी एस चंद्रशेखर  आदी मान्यवर उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *