थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतील उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या कोरेगाव मूळ – प्रयागधाम रस्त्यावर अज्ञात इसमांनी एका 20 वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून हत्या केली ही घटना काल रात्री आठच्या आसपास घडली असून घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरतात च परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पूनम विनोद ठाकूर (वय-20. रा. गगन आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मूळ, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. मृत तरुणीच्या तोंडावर दगडाने मारहाण करण्यात आली
मिळालेल्या माहितीनुसार पूनमच्या डोक्यालाही गंभीर आजार झाली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता याप्रकरणी मृत तरुणीचा भाऊ मनीष विनोद ठाकूर (वय- 23) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात तक्रार दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पूनम ठाकूर हि उरुळी कांचन येथील एका मेडिकल मध्ये कामाला जात होती. रात्री कोरेगाव मूळ – प्रयागधाम रस्त्यावर अज्ञात इसमांनी तीच्यावर दगडाने जोरदार हल्ला चढवला. यामध्ये तरुणीच्या तोंडावर व डोक्यात मोठ्या जखमा झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमीला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी संगितले. यावेळी खून झालेल्या ठिकाणी पूनम वापरत असलेली पर्स, चप्पल, पाण्याची बॉटल, मोबाईल फोन अशा वस्तू आढळून आल्या आहेत. खून कोणत्या कारणामुळे झाला याची अद्याप माहिती मिळू शकली नसून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून आरोपींच्या शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक भाटे, स्थानिक गुन्ह शाखेचे अमित सिदपाटील, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, पोलीस कर्मचारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
