पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस हवालदाराचा प्रताप मद्य प्राशन करून वाहन चालवून पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याचे माहिती समोर येत आहे या घटनेनी एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांनी रविवारी रात्री मद्यप्राशन केल्यानंतर कार चालविताना भीषण अपघात घडला असून. दारूच्या नशेत असलेल्या इनामेंनी पुणे–नगर महामार्गावर सहा वाहनांना धडक दिली, यात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळी झालेल्या गोंधळानंतरही रांजणगाव पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल करून थांबले असल्याचा आरोप स्थानिक करत आहे. संबंधित कॉन्स्टेबलला अटक करण्यात आलेली नाही तसेच वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नाही, अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिस यंत्रणेकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप करत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून याप्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
—
