पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा ). लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बापू महानवर याने दहा हजार रुपयांची मागणी करुन तडजोडी अंती पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याविरूध्द प्रोत्साहन दिल्याची कारवाई करण्यात आली
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्ध पत्राकानुसारयातील ४४वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बापू महारनवर, (वय 34 वर्षे, पद पोलीस शिपाई, कोंढवा पोलीस स्टेशन, पत्ता- फ्लॅट नं.4, ओम नमो रेसिडेन्सी, शेवाळवाडी ता. हवेली )
युवराज कृष्णा फरांदे, (वय 59 वर्षे, सेवानिवृत्त पोलीस उप निरीक्षक, रा. स्वप्नपुर्ती बंगला, वृंदावन सोसायटी, उरूळी देवाची) यांनी तक्रारदार याला कोंढवा पोलीस स्टेशन येथे दाखल असणाऱ्या वीज चोरीच्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 10,000/- रुपयांची लाचेची मागणी केली काय यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता तक्रारीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला असता लोकसेवक महारनवर याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार व त्यांचे घरमालक हे आरोपी असलेल्या वीज चोरीच्या गुन्ह्यांमध्ये तक्रारदार यांचे घरमालकाकडून दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी यापूर्वीच रक्कम रुपये 5000/- स्वीकारले होते. परंतू 5 हजार रुपये दिल्याबाबत इतरत्र चर्चा झाल्याने महारनवर यांनी तक्रारदार यांना पोलीस स्टेशनला बोलावून जे 5 हजार रुपये तू मला देणार होता ते तू तुझ्या घर मालकाला नेऊन दे असे बोलून लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्याच्या लाच मागणीस आरोपी क्र. 2 यांनी फोनद्वारे प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार यांना व त्यांचे घर मालकास पोलीस स्टेशनला बोलावून तक्रारदार यांना त्यांचे घरमालक यांच्याकडे 5 हजार रुपये देण्यास सांगितले. तक्रारदार यांचे घरमालक यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे बाहेर तक्रारदाराकडून 5000/- रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे आरोपी क्र.1 व 2 यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त नीता मिसाळ
यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक असावरी शेडगे यांनी केली.
