थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा )  गुन्हे शाखेच्या युनिट ०६च्या पथकाने घरफोडी करणा-या  सराईत आरोपीस ताब्यात घेवुन ०५ गुन्हे उघडकीस आणले असून आरोपी बिरजू राजपूत सिंग दुधाची याला ताब्यात घेऊन त्यांच्या कडून चोरीची चारचाकी गाडी व सोन्याचे दागिने असा २१लाख ४०हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
गुन्हे शाखेच्या  युनिट ०६ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना  गोपनीय बातमीदाराकडून चोखीदाणी जवळ खराडी रोडवर बिगर नंबर प्लेट ची कार संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली असता पथकाने चोखीढाणी जवळ, खराडी रोड, वाघोली जाऊन पाहणी केली असता  बिरजू राजपूतसिंग दुधानी,( वय ४० वर्षे, रा. रामटेकडी, वानवडी) यास नंबर प्लेट नसलेली मारूती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार या चोरीचे गाडीसह ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याच्याकडे घरफोडीचे गुन्हयांतील वेगवेगळया वर्णनाचे सोन्याचे दागिने मिळुन आले. आरोपीकडुन चोरीची स्विफ्ट गाडी व सोन्याचे दागिने असा एकुण २१,४०,०००/-रुपये किमतीचा  मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
दुधानी हा मोक्का गुन्हयात जामिनावर सुटलेला असुन त्याच्यावर मुंढवा पोलीस स्टेशन येरवडा पोलीस स्टेशन, चिखली पोलीस स्टेशन, भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, संत तुकारामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत
ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)  पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक युनिट -६ गुन्हे शाखेचे वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ गुन्हे शाखे कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *