थेऊर(हवेलीनामा वृत्तसेवा) पुणे जिल्हा परिषद आरक्षण सोडत प्रक्रिया पार नुकतीच पार पडली असुन हवेलीतील जिल्हा परिषदेच्या एकूण सहा गटातील आरक्षणात लोणी काळभोर व उरुळी कांचन गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या अपेक्षाना धक्का बसला आहे.हवेलीतील जिल्हा परिषद गटात एकही जागा सर्वसाधारण साठी नाही, दोन गट सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाले आहेत.

सहा गटातील आरक्षण पुढील प्रमाणे

१) उरुळी कांचन सोरतापवाडी जिल्हा परिषद गट – अनुसूचित जाती

२) थेऊर आव्हळवाडी जिल्हा परिषद गट- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

३) लोणी काळभोर कदमवाकवस्ती जिल्हा परिषद गट -अनुसूचित जाती महिला

४) कोरेगावमुळ जिल्हा परिषद गट -सर्व साधारण महिला

५) पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गट- नागरिकांचा मागास प्रवर्ग

६) खेडशिवापुर जिल्हा परिषद गट- सर्व साधारण महिला

हवेली पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर झाली असून जिल्हा परिषदेच्या सहा गटातील १२ गुणांचे आरक्षण पुढील प्रमाणे

१) उरुळी कांचन – अनुसूचित जाती महिला

२)सोरतापवाडी -नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग

३) थेऊर -सर्व साधारण

४) आव्हाळवाडी -सर्व साधारण महिला

५) कदमवाकवस्ती -अनुसूचित जाती

६)लोणी काळभोर –नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिला

७)केसनंद – सर्व साधारण

८) कोरेगाव मुळ – सर्व साधारण

९) लोणी कंद – सर्व साधारण महिला

१०) खेड शिवापूर -नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिला

११) खानापूर – सर्व साधारण

१२) पेरणे – सर्व साधारण महिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *