पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय 17 वर्ष वयोगटाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेत हवेलीतील वाडे बोल्हाई येथील जोगेश्वरी माता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने चमकदार खेळी करत अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळविला. अशी माहिती विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका पल्लवी गायकवाड यांनी दिली.

या स्पर्धेत सुरुवातीपासूनच खेळाडूंनी आक्रमक खेळ करत पहिल्या फेरीत प्रतिस्पर्धी संघाचे 20 खेळाडू बाद केले. सृष्टी गडदे, पूनम बांगर , ज्ञानेश्वरी गडदे,सेजल गावडे, समृद्धी गडदे, सेजल थिटे, संस्कृती नागवडे, प्रीती सोनकांबळे वैष्णवी चौरे प्रांजल गायकवाड साक्षी जाधव प्रज्ञा गाडगे अस्मि शिंदे समृद्धी पवार प्रज्वलि खेकडे, अनुष्का शिंगटे. प्रत्येक फेरीत या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळ करत विजय संपादन केला या संघाची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. प्रचंड मेहनतीच्या जोरावर विद्यार्थिनींनी हा विजय मिळविला.

या संघाला शालेय क्रीडा शिक्षक क्षीरसागर व पल्लवी गायकवाड

तसेच सहशिक्षक पठारे, नवले, इंगळे, कोमल गायकवाड व इतर सहकारी शिक्षकांची साथ मिळाली.

 

सन 2019 पासून जोगेश्वरी विद्यालयाने आपला या खेळावर वर्चस्व अबाधित ठेवले आहे.याच स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील संघास द्वितीय क्रमांक मिळाला यातील खेळाडू अनुष्का गायकवाड, अनुष्का गव्हाणे, सिद्धी गडदे, धनश्री बांगर, अमिता शिंदे, सोनाली चौरे, समीक्षा शिंदे, शुभ्रा शिंदे, स्वरा गायकवाड, कार्तिकी गायकवाड, श्रेया भोकरे, खुशी माळी, प्रिया जाधव, आर्या गायकवाड, उमा जाधव, सुचित्रा गायकवाड या विद्यार्थिनी होत.

श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते पंढरीनाथ तथा अण्णासाहेब पठारे संस्थेचे सचिव आमदार बापूसाहेब पठारे संस्थेचे सहसचिव ऍड. काळे,संस्थेचे संचालक वैभव पठारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुशाभाऊ गावडे, शाळा समितीचे अध्यक्ष विद्याधर गावडे, डोंगरगावच्या माजी सरपंच व संस्थेच्या संचालिका लताताई गायकवाड व विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश धुमाळ आदींनी संघाचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *