पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) विमानतळ पोलिसांनी घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्या कडून १४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोराने घरफोडी करुन घरातील दागिने व लॅपटॉप चोरी केल्याची फिर्याद दाखल झाली होती यात घराच्या दरवाजाचे कुलुप तोडुन आतमध्ये प्रवेश करुन घरामधील ९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दोन लॅपटॉप असा मुद्देमाल चोरीला गेला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी तपासाची चक्रे फिरवून तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना अज्ञात आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या पोलीस अंमलदार योगेश थोपटे व ज्ञानदेव आवारी यांनी घटनास्थळावरील व आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना तीन संशयित इसम संशयास्पद रित्या दिसून आले त्याप्रमाणे लोहगाव, पोरवाल रोड, डीवाय पाटील कॉलेज रोड, पोरवाल रोड, जिलेबी चौक, डीवाय पाटीलचौक, प्राईड वर्ल्ड सिटी, पठारेचौक च-होली, पठारे मळा, दिघी, भोसरी या भागातील तब्बल १४४ सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेजची तपासणी करुन यातील दोन आरोपीं जय संजय मोहिते, (वय २२ वर्षे रा. कॉलनीनं. ४, महादेव नगर, साईकृपा बिल्डींग शेजारी, भोसरी ) आकाश सुधीर साळवी (वय २३ वर्ष रा. स.नं. ०२, गायकवाड नगर, प्रेम सुंदर निवास दिघी ) यांना सापळा लावुन पकडले असता तपासामध्ये शुभम अशोक मडीवाळ वय २० वर्षे याचे नाव निष्पन्न झाल्याने पोलीस अंमलदार सचिन मांजरे व लालु क-हे यांना मिळालेल्या गोपनीय बातमी वरुन आरोपी शुभम अशोक मडीवाळ (वय २० वर्षे रा. आकाशवाणी, टेकावडे पेट्रोल पंपाशेजारी, गोंधळेनगर, हडपसर) यास दिनांक ०६/१०/२०२५ रोजी अटक करण्यात आली होती. तपासा दरम्यान आरोपी कडून ११,००,०००/-रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ३,००,०००/-रुपये किंमतीचे दोन लॅपटॉप असा एकूण १४लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मनोज बरुरे हे करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४,चे सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके, पोलीस उप निरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु क-हे, सचिन मांजरे, रुपेश पिसाळ, दादासाहेब बर्डे, हरीप्रसाद पुंडे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे, राकेश चांदेकर, गणेश इथापे, सागर कासार, पांडुरंग म्हस्के, महिला.पोलीस अंमलदार सना शेख यांच्या पथकाने केली आहे.
