पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने अफिम विक्री करणा-या परप्रांतीय इसमास ताब्यात घेऊन त्यांच्या कडून १किलो११२ ग्रम अफिम हा अंमली पदार्थ जप्त करुन एकूण २२लाख ३९हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना लोहगाव वाघोली रोड येथील शिवकरवस्ती, लोहगाव वाघोली रोड, शिवरकर कॉम्लेक्स, शॉप नं.२० समोरील मोकळया जागेत लोहगाव वाघोली रोड  येथे एक इसम हा काळया रंगाची सँग खांदयास अडकवुन कोणाचीतरी वाट पाहत संशयितरित्या उभा असल्याचे दिसले. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार त्याच्या जवळ गेले असता तो पळुन जाण्याचा प्रयत्न करीत होता त्याचवेळेस त्यास जागीच पकडुन विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याच्या ताब्यातील काळया रंगाच्या सॅगची झडती घेतली.  तुलसिदास किसनदास वैष्णव (वय ३० वर्षे, रा. पोस्ट वरणी, तहसिल वल्लभनगर, जि, उदयपुर, राज्य राजस्थान)याच्या ताब्यातील सग मध्ये १किलो ११२ ग्रॅम अंतिम हा अंमली पदार्थ मिळाला त्यामध्ये २२,२४,०००/-रुपये किमतीचा १ किलो ११२ ग्रॅम आफिम हा अंमली पदार्थ, १५,०००/- रु.कि. दोन मोबाईल फोन, २००/-रु.किं. एक काळया रंगाची सँग असा ऐवज मिळून आला आरोपी विरुध्द वाघोली पोलीस स्टेशनला एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई  अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, गुन्हे  निखील पिंगळे,  सहाय्यक पालीस आयुक्त, गुन्हे १  विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार सचिन माळवे, विशाल दळवी, मारुती पारधी, नागनाथ राख, संदिप शिर्के, दयानंद तेलंगे, विपुन गायकवाड, संदेश काकडे व दत्ताराम जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *