कोल्हापूर (हवेलीनामा वृतसमूह) कोल्हापुर पोलिस म्हणून कर्तव्यावर असलेल्या हवालदाराच्या चहा दुकानात बनावट नोटा छापण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच उघड झाले आहे. मिरज मधील गांधी चौक पोलिसांनी केलेल्या गुप्त तपासात सुमारे एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या . कोल्हापूर पोलिस दलातील हवालदारासह पाच जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मिरज-कोल्हापूर मार्गांवर नीलजी बामणी पुलाशेजारी एक व्यक्ती बनावट नोटा विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावर सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने छापा कारवाई करत सुप्रीत काडापा देसाई याला 42 हजार रुपयांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले.त्याच्याकडे सखोल चौकशीत कोल्हापूर पोलिस दलातील वाहन चालक हवालदार इब्रार इनामदार यांच्या “सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा” या दुकानात झेरॉक्स मशीनवर बनावट नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड झाले. कोल्हापुरात विविध ठिकाणी त्याची चहाची दुकाने आहेत.

पोलिसांनी या दुकानावर छापा कारवाई करून 500 आणि 200 रुपयांच्या एकूण 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा, कलर झेरॉक्स, नोटा मोजायचे मशीन, स्कॅनर, प्रिंटर आणि एक वाहन असा 1 कोटी 11 लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये मुख्य सूत्रधार इब्रार आदम इनामदार, सुप्रीत काडापा देसाई, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे आणि मुंबईतील सिद्धेश म्हात्रे यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *