थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा)हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गटातील गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून गट व गणातील आरक्षण सोडत लवकरच होणार आहे तत्पूर्वीच काही जिल्हा परिषद गटात इच्छूक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली असून देवदर्शन यात्रेचे फ्लेक्स गावागावात लागले आहेत. त्यामुळे नागरिकांची देखील देवदर्शन यात्रेला जाण्याची लगबग सुरू झाली असुन आधार कार्डची झेरॉक्स प्रत तसेच फोटो काढण्याची लगबग सुरू असून प्रत्येक गावात नावनोंदणी साठी कार्यकर्ते नेमले आहेत त्यामुळे उठा उठा निवडणूक आली देवदर्शन यात्रेला जाण्याची वेळ झाली अशी कुजबूज गावागावांत सुरु आहे.
लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती  निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने सगळीकडे देवदर्शन घडविण्यासाठी इच्छुक उमेदवार आपल्या मतदारांना साद घालताना दिसून येत आहेत पूर्व हवेलीतील बहुतेक सर्वच जिल्हा परिषद गटांमध्ये जागोजागी अशा अशायाचे फलक लावून मतदारांना अर्ज भरण्यासाठी आवाहन करत  येत आहेत.
         गेल्या काही निवडणुकांपासून देवदर्शनाची क्रेज वाढत असून निवडणुक लढवण्याचा फंडा बदलला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे घरातील वडीलधाऱ्या माणसांना एकदा तरी काशी, प्रयाग, आयोध्या दर्शन घडवून आणण्याची प्रत्येक श्रावण बाळाची अपेक्षा असते अशाच राजकीय श्रावण बाळांची सध्या मोठी चलती चालू असल्याचे दिसून येत आहे संपूर्ण राज्यामध्ये मतदारांना आकर्षित करण्याचा धार्मिक पायंडा पडतो आहे याचाच प्रत्येय अलीकडे दिसून येत आहे.निवडणूक लढवायाची असेल तर देवदर्शन यात्रा काढावीत लागेल अशी धारणा इच्छुकांची झाली आहे
          संपूर्ण राज्यातून साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन, अष्टविनायक दर्शन, उज्जैन महाकालेश्वर, ओंकारेश्वर दर्शन तसेच काशी विश्वनाथ व आयोध्यापती श्रीरामाचे दर्शन अशा अनेकविध धार्मिक सहलींचे मोठे पेव फुटल्याचे दिसून येत आहे आणि यामध्ये मतदार देखील मोठ्या प्रमाणात सामील होताना दिसून येतोय यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला देखील मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतो आहे यामध्ये रेल्वे सह राज्य परिवहन महामंडळ यांनाही याचा समावेश आहे.
         आणखी राजकीय आरक्षण जाहीर झाले नसले तरीही त्याची घोषणा लवकरच होईल परंतु येनकेन प्रकारे आपणच ही निवडणूक लढवणार यासाठी सर्व पर्याय खुले ठेवून या राजकीय मैदानात उतरण्याची अनेकांनी तयारी केली आहे त्यामुळे ह्या राजकीय आखाड्यामध्ये ज्याची सरशी अधिक तोच विजयी होणार असेच चित्र सध्यातरी अनुभवास येत आहे धार्मिक सहलीचा हा फंडा आमदारकी पासून सुरू झाला त्यात अनेकांनी यशस्वीपणे राबवल्याने यशस्वी झाले  त्यामुळे इच्छुक जिल्हा परिषद उमेदवारांनी निवडणूक जिंकण्यासाठी  तोच फंडा अवलंबला आहे. तर दुसरीकडे काही इच्छुक मतदारांचा संपर्क वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावत आहे मतदार संघातील कार्यकर्त्यांचे वाढदिवसाला इच्छुक केक्स बुके घेऊन शुभेच्छा देत आहे एकंदरीतच जिल्हा परिषद मतदारसंघातील वातावरण निवडणूकमय झाले आहे अभी नहीं तो कभी नहीं या आविर्भावात इच्छुक सध्या वावरताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *